Nanded Farmer Cultivating Japan Miyazaki Mango Price : सध्या सर्वत्र आंब्याच्या सिजन सुरु झाला आहे. नेहमीप्रमाणे कोकणच्या हापूस आंब्याला मोठी मागणी आहे. मात्र, याच कोकणच्या हापूसला टक्कर देत आहे तो मराठवाड्यातील एका तरुण शेतकऱ्याने पिकवलेला आंबा. नांदेडमधील शेतकऱ्याने पिकवलेल्या एका आंब्याची किंमत दहा हजार रुपये. हा जगातील सर्वात महागडा आंबा आहे.
हापूस अंब्याला सर्वाधिक भाव असतो हे आपण नेहमीच ऐकले असेल. पण असा एक आंबा आहे ज्या एका आंब्याची किंमत तब्बल दहा हजार रुपये इतकी आहे. तब्बल दहा हजार रुपये किंमत असलेला हा आहे जपान मधील मियाजाकी आंबा आहे. जपानमधील एका शहराच्या नावावरून या अंब्याला हे नाव देण्यात आले आहे. जिथे हे फळ प्रामुख्याने घेतले जाते. या एका आंब्याचे वजन अंदाजे 350 ग्रॅम असते. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, बीटा-कॅरोटीन आणि फॉलिक ॲसिडसारखे गुणधर्म असतात. या अंब्यात साखर 15 टक्के किंवा त्याहून अधिक असते. या गुणधर्मामुळे या एका अंब्याची किंमत तब्बल दहा हजार रुपये आहे. नवीन मोंढा येथे भरवण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनात हा अंबा आलाय.
नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील भोसी येथील नंदकिशोर गायकवाड या तरुण शेतकऱ्याने हाय आंब्याचे झाड लावले. नंदकिशोर स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यात होता. कोरोना काळात लॉकडाऊन लागेल्यानंतर त्याला गावी परतावे लागले. गावी येऊन शेतीत काही नवीन प्रयोग करता येतात का याबद्दल माहिती घेण्यास त्याने सुरुवात केली. इंटरनेट वर जपानमधील मियाझाकी आंब्याची माहिती भेटली. नांदाकिशोर ने फिलिपीन्स मधून मियाझाकी ची 10 रोपं आयात केली. या रोपांची काळजी घेण्यासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली.
दोन वर्षांनंतर आता फळधारणा झाली आहे. 10 आंबे झाडाला लागली आहेत. या एका आंब्याला 10 हजार रुपये किंमत मिळेल अशी अपेक्षा नंदकिशोर ला आहे. आंब्याची विक्री करण्यासाठी त्याने वेबसाईट तयार केली आहे. एका ग्राहकाने त्याच्याशी संपर्क केल्याचेही नंदकिशोरने सांगितले.