Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Pune News : लेकीला शाळेला सोडण्यासाठी चिमुकलीला घरात बंद करु गेली आई अन् मग... धक्कादायक Video Viral

Pune Video : पुण्यातील एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एक चार वर्षांची चिमुकली तिसऱ्या मजल्यावर खिडकीतून बाहेर लटकलेली दिसतेय. 

Pune News : लेकीला शाळेला सोडण्यासाठी चिमुकलीला घरात बंद करु गेली आई अन् मग... धक्कादायक Video Viral

Pune Video : पुण्यातील एका आईला चिमुकलीला एकटं घरात बंद करुन बाहेर जाणं महागात पडलं. पुण्यातील एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पुण्यातील गुजर निंबाळकरवाडी परिसरातील सोनवणे बिल्डींगमधे राहणाऱ्या चांदणे या महिलेने आपल्या चार वर्षांच्या चिमुकलीला घरात एकटं बंद करु ठेवलं होतं. झालं असं की, मोठ्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी आई निघाली पण तिने तिच्या चार वर्षांच्या मुलीला घरात कुलूप लावून बंद केलं होतं. या चिमुकलीचं भाविका असून आई आणि घरात कोणी नाही हे पाहता तिने प्रताप केला. घरातील खिडकीकडे ही मुलगी गेली आणि तिने ग्रीलमधून डोक बाहेर काढलं. धक्कादायक म्हणजे हा प्रताप करताना ती मुलगी खिडकीतून घराबाहेर गेली. हे घर इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर होतं. त्यामुळे तिलाही लक्षात आलं आपण काहीतरी धोकादायक केलं आहे. तिने खिडकीचे लोखंडी ग्रील चिमुकल्या हाताने पकडून ठेवलं. 

असा वाचला चिमुकलीचा जीव!

ती चिमुकली रडत असल्याने इमारतीमधील काही लोकांचं लक्ष तिच्याकडे गेलं आणि एकच धावाधाव सुरु झाली. अशातच इमारतीमध्ये राहणाऱ्या अग्नीशमन दलातील योगेश चव्हाण यांच्या कानावर ही बातमी पोहोचली. ते अग्नीशमन दलात तांडेल म्हणून काम करतात. घटनेच्या दिवशी त्याचा वीक ऑफ असल्याने त्यांनी मदतीसाठी धाव घेतली. पण घराला कुलूप असल्याने ते हितबल झाले. त्यांनी लगेचच मुलीच्या आईकडे धाव घेतली आणि त्यांच्याकडून घराची चावी घेऊन परत तिसऱ्या मजल्यावरील घराकडे आले. घराचा दरवाजा उघडून ते खिडकीकडे गेले आणि त्यांनी भाविकाला शांतपणे हळूच परत त्या लोखंडी खिडकीच्या ग्रीलमधून आत घेतले आणि अशाप्रकारे तिचा जीव वाचविला. भाविकाची सुखरुप सुटका झाल्यामुळे सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. 

योगेश चव्हाण यांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे त्यांचं सर्वांकडून मोठं कौतुक होतंय. आईने विचार केला की, शाळा जवळच आहे तर मुलीला सोडून लगेचच घरी येईल. म्हणून तिने चार वर्षांच्या चिमुकलीला घरी सोडलं. पण आजची मुली काय करतील याचा नेम नसतो. लहान मुलांचा पालनपोषण करताना पालकांना डोळ्यात अंजन घालून बघावं लागतं. त्या आईची ही चूक त्या चिमुकलीच्या जीवावर बेतली होती. पण देवतारी त्याला कोण मारी असाच हा व्हिडीओ आहे. 

Read More