Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

 

महादेवी हत्तीणीला कोल्हापुरात आणण्याबाबत हालचाली; राज्य सरकारच्या याचिकेला वनताराचा पूर्ण पाठिंबा

महादेवी हत्तीणीला कोल्हापुरात आणण्याबाबत हालचाली; राज्य सरकारच्या याचिकेला वनताराचा पूर्ण पाठिंबा

 

गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरकर महादेवी हत्तीणीच्या पुनरागमनासाठी आक्रमक झाले होते. याच महादेवी हत्तीणीबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. महादेवीला पुन्हा कोल्हापुरातील नांदणी मठात आणण्याची प्रक्रिया सुरू झाली असून तिच्या परतीचा मार्ग मोकळा झाला आहे. महादेवीला नांदणीत पाठवण्यासाठी वनतारा सकारात्मक असल्याचे कळते. इतकेच नव्हे तर राज्य सरकारच्या याचिकेला वनताराचा पूर्ण पाठिंबा राहील, असेही वनताराने स्पष्ट केले आहे. महादेवी हत्तीणीसाठी नांदणीत स्वतंत्र पुनर्वसन केंद्र उभारण्याची तयारीही सुरू असल्याचे समजते.

 

Read More