Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

उदयनराजेंची भाजपविरोधी भूमिका? अजान आणि ईडी कारवाईवर पाहा काय म्हणाले

खासदार उदयनराजे यांनी पुन्हा एकदा रोखठोक भूमिका मांडली आहे.

उदयनराजेंची भाजपविरोधी भूमिका? अजान आणि ईडी कारवाईवर पाहा काय म्हणाले

खासदार उदयनराजे भोसले यांची भाजपविरोधी भूमिका चर्चेत आली आहे. कारण त्यांनी भाजपच्या भूमिकेच्या विरोधात जावून आपली वेगळी भूमिका मांडली आहे. 'राष्ट्रपती राजवट लावण्याएवढी गंभीर स्थिती नाही' असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.

ईडीच्या कारवाया हास्यास्पद असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. काही लोकांनी पैसे खाल्लेत. त्यामुळे ईडी माझ्या हातात द्या. मग दाखवतो असंही उदयनराजे म्हणाले आहेत. पानटपरीवर बिडी मिळतेय ना तशी ईडीची अवस्था झाली आहे. यांना ताब्यात घ्या आणि चाप लावा सगळे सरळ होतील. असं ही ते म्हणाले

तसेच कमी डेसिबल्सवर अजान लावली जावी अशी भूमिका देखील उदयनराजे यांनी घेतली आहे.

Read More