Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

MPSC वर खूप ताण, आरोग्य विभागाच्या परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय; गिरीश महाजनांची घोषणा

MPSC Recruitment: महाराष्ट्र लोकसेवा आयोगात मॅन पावर वाढवावी लागणार आहे. एमपीएसीकडे खूप काम आहे. त्यामुळे आम्ही एमपीएससीअंतर्गतच वेगळी यंत्रणा उभी करत आहोत, असे विधान गिरीश महाजन यांनी केले. पुढच्या एक ते दोन आठवड्यात यासंदर्भात शासन निर्णय होणार असल्याचे ते म्हणाले. 

MPSC वर खूप ताण, आरोग्य विभागाच्या परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय; गिरीश महाजनांची घोषणा

गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्वाची अपडेट समोर आली आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षा एमपीएससीमार्फत होत आहेत. दरम्यान राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. यानुसार आरोग्य विभागाच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येणार आहे. 

अ आणि ब गटाच्या परीक्षा या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्वतंत्र यंत्रणेच्या माध्यमातून घेतल्या जातील, असे सांगण्यात येत आहे. अधिक्षक, डॉक्टर अशा मोठ्या पदांचा यामध्ये समावेश आहे. असे असताना आरोग्य विभागातील क आणि ड गटाच्या परीक्षा या नियमित होतात तशाच असतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगात मॅन पावर वाढवावी लागणार आहे. एमपीएसीकडे खूप काम आहे. त्यामुळे आम्ही वेगळी यंत्रणा उभी करत आहोत, असे विधान गिरीश महाजन यांनी केले. पुढच्या एक ते दोन आठवड्यात यासंदर्भात शासन निर्णय होणार असल्याचे ते म्हणाले. 

सेंट जॅार्जमध्ये डायलेसीसची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे 12  आणि 6 ओटी सुरू करत आहोत, असेही ते म्हणाले. यासोबतच प्रत्येक जिलह्यात मेडीकल कॅालेज सुरू करणात आहोत. तिथे सर्व सोयी सुविधा उपलब्ध असतील असेही ते म्हणाले. 

मुख्यमंत्री कार्यालयातून अंडरवर्ल्ड टोळी चावतेय, या संजय राऊतांच्या विधानाचा महाजनांनी समाचार घेतला. जेलमध्ये यांचेच लोक आहेत. जेलमधल्या नेत्यांना फोन गेला असे मला वाटत नाही. तुमचीच माणसे जेलमध्ये आहेच. ते जेलमधून तुम्हाला सांगते आहेत का? असा प्रश्न त्यांनी विचारला.

तसेच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत लवकरात लवकर निर्णय होईल. मुख्यमंत्री, देवेंद्रजी, अजितदादा बसले आहेत. बैठका होत आहेत, असे ते म्हणाले. 

उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलताना 'कलंक' या शब्दाचा वापर केला होता. त्यानंतर राज्यभरातील भाजप कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात निदर्शने केली. यावर गिरीश महाजन यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. काही लोक स्वत: कलंकित आहे. अनेक लोक सत्तेत आले आहेत. त्यामुळे त्यांचा तोल जात आह. सत्ता गेली हे पचवणे त्यांना जड जात आहे, असा टोला त्यांनी ठाकरेंना लगावला. 

Read More