Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

MPSC च्या परीक्षा पुढे ढकलल्या, आता 'या' तारखांना होणार मुख्य परीक्षा

राज्य लोकसेवा आयोग अर्थातच एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पुण्यातील हजारो आंदोलक विद्यार्थ्यांचं हे सर्वात मोठं यश मानलं जात आहे. 

MPSC च्या परीक्षा पुढे ढकलल्या, आता 'या' तारखांना होणार मुख्य परीक्षा

राज्य लोकसेवा आयोग अर्थातच एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पुण्यातील हजारो आंदोलक विद्यार्थ्यांचं हे सर्वात मोठं यश मानलं जात आहे. 26 ते 28 एप्रिल दरम्यान मुख्य परीक्षा घेतल्या जाणार होत्या त्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या सुधारित माहितीनुसार, आता 26, 27आणि 28 मे रोजी मुख्य परीक्षा घेतल्या जाणार आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 च्या सुधारित निकालानुसार नव्याने पात्र ठरलेल्या या 318 उमेदवारांना राज्य सेवा मुख्य परीक्षा 2024 च्या पूर्वतयारीसाठी पुरेसा अवधी मिळाला नसल्यामुळे दिनांक 26 ते 28 एप्रिल 2025 या कालावधीत नियोजित मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याबाबत उमेदवारांकडून आयोगास निवेदने प्राप्त झाली आहेत. उमेदवारांकडून प्राप्त निवेदने तसंच इतर सर्व बाबींचा साकल्याने विचार करून प्रस्तुत राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२४ सुधारित वेळापत्रकानुसार दिनांक 27, 28 व 29 मे, 2025 या कालावधीत घेण्यात येईल. 

आरक्षणाच्या अनुषंगाने उद्भवलेल्या असाधारण परिस्थितीचा विचार करून परीक्षेच्या वेळापत्रकातील प्रस्तुत बदल हा एकवेळची अपवादात्मक बाब म्हणून आयोगाकडून सदर निर्णय घेण्यात आला आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

Read More