Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

 

एसटी महामंडळाच्या 2 हजार बस भंगारात; MSTCतर्फे होणार एसटी बसचा लिलाव

एसटी महामंडळाच्या 2 हजार बस भंगारात; MSTCतर्फे होणार एसटी बसचा लिलाव

 

एसटी महामंडळाच्या 2 हजार बसेस आता भंगारात काढण्यात येणार आहेत. धातू भंगार व्यापार महामंडळ अर्थात एमएसटीसीच्या माध्यमातून या बसचा लिलाव करण्यात येणार आहे. राज्यभरातील 32 आगारांमध्ये सध्या या बसेस उभ्या असून, त्या मुंबईमध्ये उच्च बोलीदाराला विकण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. एसटी महामंडळाच्या ताफ्यात सुमारे 14 हजार बसेस असून, वयोमर्यादेमुळे जुन्या झालेल्या बसेस भंगारात काढण्यास सुरुवात केलीय.दरवर्षी जवळपासे 2 हजार बसेस भंगारात निघत असून, येत्या दोन ते तीन वर्षात 5 हजार बसेस भंगारात निघणार आहेत. एसटीच्या बसला योग्य दर मिळेल का, अशी शंका व्यक्त करण्यात येतेय.

Read More