Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Bullet Train: महाराष्ट्राच्या दिशेने बुलेट ट्रेन प्रोजेक्ट सुसाट, आता किती शिल्लक राहिलंय काम? मोठी अपडेट समोर!

Mumbai-Ahmedabad Bullet Train:  हा स्टील पूल मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या प्रगतीचे एक उत्तम उदाहरण आहे. 

Bullet Train: महाराष्ट्राच्या दिशेने बुलेट ट्रेन प्रोजेक्ट सुसाट, आता किती शिल्लक राहिलंय काम? मोठी अपडेट समोर!

Mumbai-Ahmedabad Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनमध्ये आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. गुजरातमधील भरुचजवळील डीएफसीसी (डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर) ट्रॅकवर 100 मीटर लांबीचा स्टील ब्रिज पूर्ण झाला आहे. 'मेक इन इंडिया' उपक्रमांतर्गत हा ब्रिज बांधण्यात आला. या प्रकल्पासाठी गुजरातमध्ये बांधल्या जाणाऱ्या 17 स्टील ब्रिजपैकी हा आठवा आहे. संपूर्ण कॉरिडॉरमध्ये एकूण 27 स्टील ब्रिज बांधले जातील.

हा स्टील ब्रिज 1400 मेट्रिक टन वजनाचा असून 14.6 मीटर उंच आणि 14.3 मीटर रुंद आहे. तो त्रिची (तामिळनाडू) येथील एका वर्कशॉपमध्ये बांधण्यात आला होता आणि विशेषतः डिझाइन केलेल्या ट्रेलर्सच्या मदतीने बांधकाम स्थळी आणण्यात आला होता. पूल बसवण्यासाठी 84 मीटर लांब आणि 600 मेट्रिक टन वजनाचा लॉन्चिंग नोज वापरण्यात आला होता. त्याच्या मजबुतीसाठी सुमारे 55,300 टॉर-शीअर प्रकारचे हाय स्ट्रेंथ (टीटीएचएस) बोल्ट वापरले गेले. हा पूल विशेष पेंटिंग (सी५ सिस्टीम) आणि इलास्टोमेरिक बेअरिंग्ज वापरून बांधण्यात आला आहे, जे 100 वर्षे टिकतील अशा प्रकारे डिझाइन केलेले आहेत.

50 किमी एलिव्हेटेड मार्ग

मुंबई ते अहमदाबाद असा एकूण 503 किमी लांबीचा ट्रॅक तयार केला जात आहे. गुजरातमध्ये, 352 किमी लांबीच्या मार्गापैकी 300 किमी लांबीचा एलिव्हेटेड मार्ग तयार करण्यात आला आहे. महाराष्ट्रातही, बुलेट ट्रेनसाठी 50 किमी लांबीचा एलिव्हेटेड मार्ग तयार करण्यासाठी खांब उभारण्याचे काम सुरू आहे. त्याच वेळी बीकेसी, विरार, बोईसर आणि ठाणे येथे स्टेशन तयार करण्याचे काम सुरू आहे. विरार आणि बोईसर स्थानकांवर स्लॅब तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. तर ठाणे स्थानकाचे पायाभरणीचे काम सुरू आहे. त्याच वेळी उल्लास आणि वैतरणा नद्यांवर पूल तयार करण्याचे काम सुरू आहे.

हा पूल जमिनीपासून 18 मीटर उंचीवर तात्पुरत्या खांबांना जोडण्यात आला होता. तो बसवण्यासाठी 250 टन क्षमतेचे दोन सेमी-ऑटोमॅटिक जॅक वापरण्यात आले. या जॅकने मॅक-अ‍ॅलॉय बारच्या मदतीने पूल ओढला आणि योग्य ठिकाणी बसवला. ही प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित आणि अचूक होती. पूल बसवण्यासाठी, डीएफसीसी ट्रॅकवर वाहतूक अधूनमधून रोखण्यात आली. हे ब्लॉक टप्प्याटप्प्याने केले गेले आणि मालवाहतुकीत कमीत कमी व्यत्यय आला जेणेकरून रेल्वे सेवांवर परिणाम होणार नाही.

हा स्टील पूल मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या प्रगतीचे एक उत्तम उदाहरण आहे. हा प्रकल्प केवळ भारतात हाय-स्पीड रेल्वे प्रवासाला चालना देणारा असून 'मेक इन इंडिया' अंतर्गत देशाची तांत्रिक क्षमता जगाला दाखवणारा आहे. अशी बांधकाम कामे देशाच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यात आणि आधुनिक वाहतूक सुविधा देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. हा पूल मजबूत आणि टिकाऊ तर आहेच सोबत बुलेट ट्रेनचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल आहे.

राज्यातील बुलेट ट्रेनचा मार्ग

बुलेट ट्रेनसाठी बीकेसीमध्ये बांधले जाणारे पहिले स्टेशन भूमिगत असेल. ठाण्यातील बीकेसी आणि शिळफाटा दरम्यान 21 किमी लांबीचा भूमिगत मार्ग असेल. शिळफाटा ते गुजरातच्या सीमेजवळील झरोली गावापर्यंत बुलेट ट्रेनचा 135 किमी लांबीचा उन्नत मार्ग असेल. 135 किमी लांबीच्या मार्गापैकी 103 किमी मार्ग 2575 एफएसएलएम गर्डर वापरून बांधला जाईल, तर 17 किमी मार्ग सेगमेंटल गर्डर वापरून बांधला जाईल.

Read More