Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

आजपासून मुंबई-औरंगाबाद विमान सेवा सुरु

औरंगाबादमध्ये आज पासून इंडिगो एयरलाइंसने आपली सेवा सुरू केली आहे. 

आजपासून मुंबई-औरंगाबाद विमान सेवा सुरु

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये आज पासून इंडिगो एयरलाइंसने आपली सेवा सुरू केली आहे. इंडिगो एयरलाइंसचं पहिलं विमान मुंबईहून औरंगाबादेत आलं आणि ते विमान चालवण्याचा मान मराठवाड्यातील, औरंगाबाद मधील पहिली महिला वैमानिक कॅप्टन कीर्ती राऊत यांना मिळाला. जन्म झालेल्या शहरात विमान चालवायला मिळणं हे माझ्यासाठी स्वप्नवत असल्याचं कॅप्टन किर्ती यांनी सांगितलं. 

कीर्ती राऊत विमानतळावर येताच त्यांचं ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आलं. नागरिकांनीही मोठी गर्दी त्यांच्या स्वागतासाठी केली होती. औरंगाबाद विमानतळावरून विमानांची संख्या वाढवण्यासाठी औरंगाबाद टुरिस्ट फोरमसह लोकप्रतिनिधी प्रयत्न करत होते.

Read More