Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

महाराष्ट्र हादरला! 10 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून गुप्तांगात स्क्रूड्रायव्हर टाकला; विवाहित महिलेच्या प्रियकराचे अमानवी कृत्य

बलात्काराच्या घटनेने मुंबई हादरली आहे. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिच्या गुप्तांगात स्क्रूड्रायव्हर टाकला आहे. 

 महाराष्ट्र हादरला! 10 वर्षाच्या  मुलीवर अत्याचार करून गुप्तांगात स्क्रूड्रायव्हर टाकला; विवाहित महिलेच्या प्रियकराचे अमानवी कृत्य

Mumbai Crime News :  महाराष्ट्राला हादरवणारी घटना मुंबईत घडली आहे. 10 वर्षीच्या  मुलीवर अत्याचार करून गुप्तांगात स्क्रूड्रायव्हर टाकला आहे.  पीडित मुलीच्या आईच्या प्रियकरानेच हे अमानवी कृत्य केले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मुलीच्या आईसह तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे. 

मुंबईच्या जोगेश्वरी पूर्व येथील मेघवाडी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे, 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून मुलीच्या गुप्तांगात स्क्रूड्रायव्हर टाकला आहे. या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून आरोपीने याचा व्हिडिओ देखील काढला आहे. या घटनेने मुंबई पुन्हा एकदा हादरली आहे. 

या प्रकरणी मेघवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत 24 वर्षीय पुरुषाला आणि 21 वर्षीय त्याच्या प्रेयसीला अटक केली आहे. पीडित मुलीची आई एका केटरिंग सर्विस फॉर्म मध्ये सुपरवायझर म्हणून काम करते. 14 जून आणि 15 जून रोजी जेव्हा पीडित मुलीची आई कामावर गेली होती तेव्हा आरोपीने दहा वर्षीय मुलीवर चार वेळा लैंगिक अत्याचार केला.

आरोपींने तिच्यावर वारंवार अत्याचार केला आणि तिचा गुप्तांगात स्क्रूड्रायव्हर टाकला इतकेच नाही तर आरोपीच्या प्रेयसीने या संपूर्ण कृत्याचा व्हिडिओ शूट केला.  यानंतर आरोपीने महिलेवर टोकदार वस्तूने हल्ला केला. घटनेबाबत जर कोणाला माहिती दिलं तर काढलेला व्हिडिओ व्हायरल करण्याचे धमकी सुद्धा दिली,

या घटनेनंतर मुलीने मेघवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. यानंतर मेघवाडी पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत 24 वर्षीय पुरुषाला आणि त्याच्या 21वर्षीय प्रेयसीला अटक केली आहे. अटक आरोपीकडून अधिक तपास मेघवाडी पोलीस करत आहेत. 

हे देखील वाचा...  मुंबई हादरली! विमानाच्या महिला पायलटवर धावत्या कॅबमध्ये लैंगिक अत्याचार 

Read More