Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

24 लाख रुपये, 8 तोळे सोनं अन् 'तो' कॉल... म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं स्वत:ला संपवलं; शेवटी म्हणाली, 'माझा त्रास...'

Mumbai Crime News: या प्रकरणामधील सविस्तर तपशील समोर आला असून मयत महिलेच्या भावाने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीमध्ये बहिणीसोबत घडलेल्या धक्कादायक प्रकाराचा तपशील सांगितला आहे.

24 लाख रुपये, 8 तोळे सोनं अन् 'तो' कॉल... म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं स्वत:ला संपवलं; शेवटी म्हणाली, 'माझा त्रास...'

Mumbai Crime News: मुंबईतील म्हाडातील उपनिबंधकांच्या पत्नीने शनिवारी रात्री टोकाचा निर्णय घेत स्वत:ला संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आङे. हा सारा प्रकार कांदिवलीमधील एका नामांकित इमारतीमधील घरात घडला आहे. "माझा त्रास कधीच थांबणार नाही. मी त्यांना नको आहे,' असे म्हणत म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीने गळफास घेत आत्महत्या केली. "मी उच्चपदस्थ अधिकारी आहे, तुझी माझ्यासोबत राहण्याची लायकी नाही," असे टोमणे मारून पतीने पैशांसाठी तगादा लावल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप मयत महिलेच्या भावाने केला. मयत महिलेच्या भावाने केलेल्या तक्रारीच्या आधारे समता नगर पोलिसांनी गुन्हा नोंदण्यात आला असून म्हाडा अधिकारी असलेल्या पतीला रविवारी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणामध्ये म्हाडा अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिच्या वडिलांनी दिलेले 24 लाख अन् 8 तोळे सोनं

आत्महत्या करणाऱ्या महिलेचं नाव रेणू बापू कटरे असं असून ती 42 वर्षांची होती. कांदिवलीमधील प्रतिष्ठित सोसायटीमध्ये ती पती आणि दोन मुलांसह राहत होती. मृत महिलेचा भाऊ सचिन शेजाळने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, रेणूची सासू ही लग्नात कमी हुंडा दिला म्हणून तिला सतत टोमणे मारायची. रेणूच्या वडिलांनी 8 तोळे सोन्याच्या बांगड्या दिल्या होत्या. त्यापाठोपाठ 2023 मध्ये 12 लाख आणि 2024 साली 10 लाख रुपये दिले. पतीने तिला काठीने मारहाण केली होती, असाही आरोप मृत महिलेच्या भावाने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत केला आहे.

तोडगा काढण्यासाठी होणार होती बैठक पण...

वादावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही कुटुंबातील ज्येष्ठांनी 27 जुलै रोजी बैठक घेण्याचे ठरवले. तिच्या पतीने आधी या बैठकीसाठी होकार दिला. मात्र नंतर नकार दिला. त्यामुळे ती आणखी नैराश्यात गेली.

तो ठरला शेवटचा कॉल

26 जुलैला सकाळी रेणूने तिच्या भावाला कॉल केला. त्यावेळी, "पती विनाकारण शिवीगाळ, मारहाण करतो. वाद मिटवण्यासाठी ठरवलेल्या मिटिंगला येण्यास टाळाटाळ करताो. माझा त्रास कधीच थांबणार नाही," असे म्हणत तिने फोन ठेवला. त्यानंतर, सायंकाळी ओळखीच्या डॉक्टरला कॉल करून, "पतीने फसवले, तो मिटिंग टाळत आहे. त्यांना मी नको आहे,' असे बोलून फोन ठेवला. डॉक्टरांनी पुन्हा कॉल केला तेव्हा तिने तो उचलला नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी तिच्याशी संपर्क केला पण तिने प्रतिसाद दिला नाही. तेव्हा पतीला कॉल केला. त्याने रेणूने स्वतःला फ्लॅटमध्ये बंद केले असे सांगितले, असे तक्रारीत नमूद करण्यात आलं असून रेणूने राहत्या खोलीमध्ये गळफास घेऊन स्वत:ला संपवलं. 

Read More