Mumbai Crime News: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. 46 वर्षांच्या व्यक्तीने पत्नीलाच पेटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे. पत्नीसोबत झालेल्या भांडणातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दिनेश आव्हाड असं आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेंबूर येथील रहिवासी असलेल्या दिनेश आव्हाड यांचे त्यांच्या पत्नीसोबत वाद झाले. दिनेश याला पत्नीसोबत शारिरक संबंध ठेवायचे होते. मात्र महिलेने यासाठी त्याला नकार दिला. कामावर जायला उशीर होतोय असं सांगून महिलेने त्याला नकार दिला. यावरुन दोघांमध्ये वाद झाले. नंतर वादाचे रुपांतर मोठ्या वादात झाले. या वादातून पत्नीने तिच्या अंगावर रॉकेल ओतून घेतले पण माचिसची काडी पेटवली नव्हती, मात्र याच संधीचा फायदा घेत पतीने गॅस स्टोव्हमधून कागदाचा तुकडा पेटवला आणि तो तिच्यावर फेकला. ज्यामुळे तिच्या कपड्यांना आग लागली.
शुक्रवारी दुपारी ही घटना घडली, आगीने पेट घेतल्यानंतर गंभीर अवस्थेत महिला रुग्णालयात पोहोचली. महिला गंभीर जखमी आहे. महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आव्हाडला अटक केली आहे. हत्येचा प्रयत्न या गुन्ह्याखाली महिलेला अटक करण्यात आली आहे. याबाबत अद्याप तपास सुरू आहे. महिला ही मदतनीस असून इतरांच्या घरी कामासाठी जाते. कामाला जायला उशीर होत असल्याने तिने नवऱ्याला नकार दिला त्याचाच राग मनात ठेवून त्याने पत्नीला पेटवले.
अनैतिक संबंधाला विरोध केला म्हणून पेस्टीसाईडचं इंजेक्शन देऊन पत्नीचा निर्घूणपणे खून करणाऱ्या पतीसह पाच जणांना पश्चिम देवगड पोलिसांनी अटक केली आहे. धुळे शहरातील वलवाडीतील सैन्य दलात कार्यरत असलेल्या कपिल बागुल याने आपली पत्नी शारदा बागुल हिचा तिला बळजबरीने पेस्टिसाइडचे इंजेक्शन देऊन तिचा खून केला.