Mumbai Hotel Bathroom Slipper Trick : हॉलेटमध्ये जेव्हा कोणते पाहुणे येतात तेव्हा अनेक लोकं हे तिथल्या अनेक गोष्टी ते सोबत घेऊन जातात. तर हॉटेलमधून सर्वसामान्यपणे लोकं टूथब्रश, टूथपेस्ट आणि शॅम्प्यूसारख्या छोट्या गोष्टी, डिस्पोजेबल गोष्टी घेऊन जाण्यात काही हरकत नसते. काही गोष्टी आहेत ज्या घेऊन जाण्यावर बंदी असते. चप्पल, टॉवेल, लॅम्प किंवा हॉटेलच्या इतर काही महत्त्वाच्या गोष्टी घेऊन गेल्यास त्याला चोरी केली असं म्हटलं जातं. त्याचा परिणाम काय होतो त्यांना कसं कळणार असा विचार तुम्ही करत असाल. तर तुमच्या हॉटेलच्या बीलमध्ये इतर गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हॉटेलमध्ये नेहमीच याविषयी स्पष्ट सांगितलेलं असतं की त्या रूममधून तुम्ही काय घेऊन जाऊ शकतात आणि काय नाही. या सगळ्या गोष्टींचं पालन तिथल्या लोकांनी करायला हवं.
नुकत्याच मुंबईच्या एका हॉटेलमध्ये फुकटात चप्पलांची चोरी थांबण्यासाठी एक शक्कल लढवली आहे. एक ट्विटर वापरकर्त्यानं, चप्पलचा एक फोटो शेअर केला आहे. एक हिरवी आणि दुसरी पिवळी. ही चप्पल हॉटेलच्या बाथरुमच्या दरवाज्याजवळ खास ठेवण्यात आली होती. हॉटेलने वेगवेगळ्या रंगांच्या चप्पल ठेवल्या, ज्यामुळे जे लोकं तिथे राहायला येतील ते त्यांच्या घरी ही चप्पल घेऊन जाणार नाही. वापरकर्त्याच्या मते, या अगदी सोप्या युक्तीनं चप्पल फक्त हॉटेलच्या रुममध्येच वापरल्या जातात आणि पाहुणे त्यांना चोरी करून घरी घेऊन जात नाहीत. ही पोस्ट शेअर करत त्यानं कॅप्शन दिलं की 'हे बॉम्बे हॉटेल आता अशा प्रकारचे बाथरूम चप्पल देतात, पण लोक त्या फेकू नयेत यासाठी वेगवेगळ्या चप्पल ठेवतात.'
This Bombay hotel provides bathroom slippers. But to ensure people don't flick them, they provide mismatched pairs. pic.twitter.com/zwAUMoPITI
— Thejaswi Udupa (@udupendra) February 28, 2025
ही पोस्ट व्हायरल झाली आणि हॉटेलच्या या आयडीयाची सोशल मीडियावर चांगलीच स्तुती करण्यात येत आहे. अनेकांनी हॉटेलच्या उपायांची स्तुती केली जाते. पण काहींनी या आयडीयावर शंका उपस्थित केली आहे. असं असलं तरी काही पाहुणे हे चप्पल चोरण्यासाठी पर्याय शोधताना दिसतील. एक नेटकरी म्हणाला, 'माझे वडील सांगायचे, जेव्हा तुम्ही कुणाला पेन देत असाल, तेव्हा कधीही टोपण देऊ नका.'दुसरा नेटकरी म्हणाला, 'जे लोक चप्पल चोरतात. ते कोणतीही चप्पल चोरू शकतात. त्यांना काही वाटत नाही.' तिसऱ्या नेटकऱ्यानं लिहिलं की, 'मला माहीत नव्हतं की, हिरव्या आणि पिवळ्या रंगाची चप्पल एकत्र खूप चांगली दिसते.' आणखी एक नेटकरी म्हणाला,'हा एक चांगला पर्याय आहे! हे हॉस्पिटॅलिटी रिव्हर्स सायकॉलॉजीसारखा आहे!' दुसरा नेटकरी म्हणाला, 'मला वाटतं जर भारतीय तिथे गेले तर ते नक्कीच दुसऱ्या व्यक्तीसोबत अगदी त्याच रंगाची चप्पल बदलून घेतेली. जेणे करून त्यांना ते चप्पल घेऊन जाता येतील.'