Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

20 वर्षांपासून एकच कुकर वापरणं पडलं महागात; 50 वर्षीय व्यक्तीला गंभीर आजाराचा विळखा, तुम्हीही तेच करताय?

Pressure Cooker Causes Severe Lead Poisoning: तुम्हीदेखील वर्षानुवर्षे एकच प्रेशर कुकर वापरताय, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

20 वर्षांपासून एकच कुकर वापरणं पडलं महागात; 50 वर्षीय व्यक्तीला गंभीर आजाराचा विळखा, तुम्हीही तेच करताय?

Pressure Cooker Causes Severe Lead Poisoning: किचनमध्ये असे अनेक भांडी असतात जी आपण पूर्वजांपासून वापरत असतो. अनेक भांडी ही आजी-आजोबांच्या काळातील असतात. पण पूर्वीची भांडी ही शक्यतो तांबा-पितळेची असत. हल्ली स्वयंपाकघरात  अॅल्युमिनियम, स्टील ही भांडी जास्त प्रमाणात आढळतात. पण ही भांडी दीर्घकाळ वापरणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. मुंबईत अलीकडेच एक हादरवणारी घटना घडली आहे. एक व्यक्ती अनेक वर्षांपासून एकाच प्रेशर कुकरचा वापर करत होता. काही महिन्यांपासून 50 वर्षीय व्यक्तीला सतत पोटात वेदना, थकवा आणि स्नायू कमकुवत होणे यासारखे लक्षण दिसत होते. सुरुवातीला नेमका काय आजार आहे हे डॉक्टरांनाही समजले नाही. अखेर या व्यक्तीच्या सर्व चाचण्या केल्यानंतर शिसे या धातुमुळं विषबाधा झाल्याने निदान समोर आले. 

डॉक्टरांनी जेव्हा त्यांच्या खाण्या-पिण्याच्या सवयींबद्दल जाणून घेतले तेव्हा समोर आले की, त्यांची पत्नी तब्बल 20 वर्ष एकच प्रेशर कुकर वापरत होती. याच प्रेशर कुकरमुळं लीड पॉयझनिंग किंवा शिसे धातुतून विषबाधा झाली. लीड पॉयझनिंगमुळं शरिरावर गंभीर परिणाम होऊ शकतात. गंभीर आरोग्य समस्यांचा धोका असतो. सुरुवातीला ही लक्षणे सूक्ष्म ते गंभीर स्वरुपाची असतात. इंटर्नल स्पेशलिस्ट डॉक्टर विशाल गबाळे यांनी इन्स्टाग्रामवर हा प्रकार शेअर केला आहे. 

डॉ. विशाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पेशंटच्या शरीरातील शिशाचे प्रमाण प्रति डेसीलिटर 22 मायक्रोग्रॅम होते. म्हणजेच क्रॉनिक लीड विषबाधा. जुना आणि खराब झालेला अॅल्युमिनियम कुकर आल्मयुक्त पदार्थांच्या संपर्कात येतो, तेव्हा शिसे आणि अॅल्युमिनियमचे कण अन्नात विरघळतात. याचे अतिरिक्त प्रमाण झाल्यास न्यूरल कॅल्शियम चॅनेल ब्लॉक होतात, त्यामुळं मेंदुला जाणारे सिग्नल मंदावतात. संबंधित रुग्णाला नंतर चेलेशन थेरपी देण्यात आली, त्यानंतर आता त्यांची प्रकृती उत्तम आहे. 

शिशाची विषबाधा तेव्हा होते जेव्हा तुमच्या रक्तात शिशाचे अतिप्रमाण आढळते. शिसे तुमच्या शरीरातील अनेक अवयवांवर परिणाम करते. यात मेंदू, नसा, रक्त, पचनसंस्था यांचा समावेश आहे. दीर्घकालीन शिसे तुमच्या पोटात गेल्यामुळं त्याचा परिणाम मज्जासंस्था, मेंदू आणि इतर अवयवांचे नुकसान होऊ शकते, असं डॉक्टर सांगतात. 

लीड पॉयझनिंगची लक्षणे कोणती?

डोकेदुखी, उलट्या, थकवा, अशक्तपणा, पाय सुन्न होणे, लैंगिक इच्छा कमी होणे, वंध्यत्व, मूत्रपिंडाच्या समस्या जाणवतात. शिशे हे खाण्या-पिण्याच्या माध्यमातूनच नाही तर श्वासाद्वारे, त्वचेच्या संपर्कात आल्यानेदेखील शरीरात पोहोचते. अनेकदा सुरुवातीची लक्षणे फार हलकी असतात. मात्र त्यांचे गंभीर परिणाम होऊ शकतात. 

Read More