Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

पालकांना हादरवणारी बातमी! मुंबईत 13 वर्षाच्या मुलाने 5 वर्षीय बहिणीला संपवलं; कारण...

Mumbai Crime News: मुलगी बेपत्ता असल्याने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर तिचा शोध सुरु झाला.

पालकांना हादरवणारी बातमी! मुंबईत 13 वर्षाच्या मुलाने 5 वर्षीय बहिणीला संपवलं; कारण...

Mumbai Crime News: खरं तर भावंड ही अगदी लहानपणापासून सोबत असलेली आणि एकमेकांना आधार देणारी म्हणून कायमच जवळची असतात. वय कोणतंही असो भाऊ किंवा बहीण हे आपलं सिक्रेट जपणारे, आई-वडिलांसमोर आपली बाजू घेणारे इथपासून ते अगदी छोटछोट्या गोष्टींवरुन वाद घालणारी व्यक्ती असं अगदी टोकाचं नातं पाहायला मिळतं. मात्र याच नात्याला धक्का देणारं कृत्य नालासोपाऱ्यामध्ये घडलं आहे. येथील एका अल्पवयीन मुलाने आपल्या बहिणीचा जीव घेतला आहे. आरोपी हा अवघ्या 13 वर्षांचा असून मयत मुलगी 5 वर्षांची आहे. 

डोक्यात दगड घालून केली हत्या

सर्व नातेवाईक मामे बहिणीचेच लाड करतात ही गोष्ट सहन न झाल्यामुळे 13 वर्षीय मुलाने आपल्या 5 वर्षीय मामे बहिणीची हत्या केल्याची घटना समोर आल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. सदर घटना नालासोपाऱ्यातील श्री राम नगर परिसरात घडली आहे.  या अल्पवयीन मुलाने आपल्या मामे बहिणीला गोड बोलून घराजवळून डोंगरावर नेले. तेथे त्याने तिचा गळा आवळून व डोक्यात दगड घालून हत्या केली. मुलगी घरातून गायब झाल्याने घरातील चिंतेत पडले. मात्र बहिणीला जीवे मारल्यानंतर घरी आल्यानंतरही या मुलाने घरच्यांना काहीच सांगितलं नाही.

पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली तक्रार

मुलाच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेत मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी मध्यरात्री डोंगर परिसराचा तपास केला असता त्यांना मुलीचा मृतदेह आढळून आला. मात्र या चिमुकलीची कोणी आणि कशासाठी हत्या केली असेल याबद्दलचा काहीच पुरावा सापडत नव्हता. अखेर ही चिमुकली शेवटची आरोपीसोबत दिसून आल्याने पोलिसांनी या अल्पवयीन मुलाची कसून चौकशी केली.

नक्की वाचा >> Swargate Rape Case: 'दादा, मला...', बालात्कारानंतर दत्ता गाडेला काय म्हणाली पीडिता? स्वत: केला खुलासा

पोलिसांनी आरोपीला घेतलं ताब्यात

पोलिसांनी दिलेला दम, सतत विचारण्यात आलेल्या प्रश्नांसमोर या मुलाचा संयम सुटला आणि त्याने स्वतःच तिची हत्या केल्याची कबुली दिली. आरोपी मुलगा अल्पवयीन असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक दिलीप राख यांनी दिली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Read More