Mumbai News : मुंबई... मायानगरी, स्वप्ननगरी अशी नावं या शहराला दिली जातात. अगदी सामान्यांच्या मुंबईपासून ते श्रीमंतांच्या मुंबईपर्यंतची या शहराची रुपं बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाला कायमच भुरळ पाडत असतात. अशा या मुंबई शहरामध्ये घर घेण्याचं स्वप्न पाहणारे आणि ते स्वप्न साकार करणारेही कमी नाहीत. काळ पुढे गेला तसतशी ही मुंबईसुद्धा पुढे गेली आणि पाहता पाहता मुंबईच्या कक्षा इतक्या रुंदावल्या की या शहराकडे सध्या पाहतानं भारावल्यावाचून दुसरी कोणतीही भावना नसते.
गेल्या दोन दशकांमध्ये मुंबईचा एकंदर प्रवास पाहिला तर, शहराच्या विकासाचा वेग दुप्पट असल्याचं लक्षात आलं. उपनगरांना जोडणाऱ्या रस्त्यांपासून, समुद्रावरील पूर ते अगदी सागरी किनारा मार्ग, मुंबई खऱ्या अर्थानं अतिप्रचंड वेगानं या जगाशी जोडली जात असल्याचं पाहून अनेक विकासकांनीसुद्धा या शहरात स्वारस्य दाखवलं. इतकंच नव्हे, तर मुंबईत घर घेणाऱ्यांची त्यातही मोठं आणि आलिशान घर घेणाऱ्यांची संख्यासुद्धा लक्षणीयरित्या वाढली आणि पाहता पाहता या शहरानं कमालच केली. कारण, एकट्या जुलै महिन्यात शहरात घरांची विक्रमी विक्री झाली असून, त्यातून राज्याच्या तिजोरीत तब्बल 1100 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. (Mumbai Real Estate)
जुलै 2025 मध्ये मोठ्या संख्येनं घरांची विक्री झाली, इचकंच नव्हे तर त्यातून स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी प्रक्रियेतून जमा झालेला महसुलाचा आकडा मे आणि जून महिन्यांपेक्षाही जास्त होता. अधिकृत आकडेवारीनुसार मुंबईतील 12500 हून अधिक घरांची जुलै महिन्यात झाली आणि या घरांच्या विक्रीतून मुद्रांक शुल्कापोटी राज्याच्या तिजोरीत तब्बल 1114 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला.
Knight Frank India नं जारी केलेल्या माहितीनुसार शरहात 1000 sq ft इतक्या क्षेत्रफळांपर्यंतच्या घरांना अनेकांनी पसंती दिली असून, या घरांनासाठीच्या 82 नोंदी करण्यात आल्या. आहे. 1 ते 5 कोटी रुपयांच्या घरांना तुलनेनं कमी पसंती मिळाली, इथं घर नोंदणीचा आकडाही तुलनेनं कमी राहिला. तर 5 कोटींहून अधिक किमतीच्या घरांचीसुद्धा विक्री मोठ्या प्रमाणात झाली असून यात नोंदणीचा आकडा 6 टक्के इतका होता.
जाणकार आणि अभ्यासकांच्या मते एकिकडे जागतिक अर्थसत्तेमध्ये बरीच वादळं येच असली तरीही मुंबईतील Real Estate क्षेत्राचा आलेख मात्र गगनाला गवसणी घालताना दिसत आहे. शहरामध्ये आलिशान घरखरेदीला प्राधान्य देणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे त्यामुळं मुंबई ही सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय होऊन बसलीये असं म्हणायला हरकत नाही.