Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

कुलाबा ते वसई-विरार, मीरा भाईंदर ते ठाण्यापर्यंत मेट्रोने फिरता येणार; मेट्रो 7Aचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण

Mumbai Metro 7A: मेट्रो मार्ग ७अ मुळे मुंबई महानगर प्रदेशातील विविध मेट्रो मार्ग थेट विमानतळापर्यंत मेट्रोने जोडले जातील.

कुलाबा ते वसई-विरार, मीरा भाईंदर ते ठाण्यापर्यंत मेट्रोने फिरता येणार; मेट्रो 7Aचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण

Mumbai Metro 7A:  मुंबईत मेट्रोचे जाळे शहरासह उपनगरात पसरत आहे. मेट्रोची कामे वेगाने सुरू आहे. लवकरच मेट्रोच्या 2 मार्गिका प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. 7 मेट्रोना एकाच ठिकाणी जोडणाऱ्या मेट्रो 7A मार्गिकेने मोठा टप्पा पार केला आहे. मेट्रो 7A मार्गिकेसाठी भूमिगत बोगद्याचा ब्रेकथ्रु आज पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भूमिगत बोगद्याचा दिशा नावाच्या टनेल बोअरींग मशीनद्वारे ब्रेकथ्रु झाला. ही मेट्रो मार्गिका कशी असेल आणि प्रवाशांना काय फायदा होणार जाणून घेऊया. 

मेट्रो 7A हा मुंबईतील मेटो प्रकल्पाना एकत्र जोडणारा हा महत्त्वाचा दुवा आहे. मुंबईतील 7 मेट्रो प्रकल्प एकमेकांशी जोडले जाणार आहेत. या मेट्रो मेट्रो 7Aच्या या 3.4 किमीच्या प्रकल्पामुळे वसई विरार, मिराभाईंदर तसेच ठाणे; नवी मुंबईसारखे परिसर थेट मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडला जाणार आहेत. मेट्रो 7A ही अंधेरी ते विमानतळापर्यंत जाणे सोप्पे होणार आहे. या मेट्रोमुळं हे अंतर अवघ्या 8 मिनिटांत कापणे शक्य होणार आहे. 

मेट्रो 7A हा मार्ग दहिसर ते मीरा भाईंदर म्हणजेच मेट्रो 9चा विस्तार आहे. या मार्गावर एकूण 10 स्थानके आहेत. मेट्रो मार्ग 7 अने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मेट्रो मार्ग ३ आणि आंतराष्ट्रीय विमानतळादरम्यान भूमिगत स्थानकावर आंतरबदल(interchange) करण्याची सुविधा सहज उपलब्ध होणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरांसोबतच इतर शहरांना जोडणी देणार आहे. 

अंधेरी स्टेशन व विले पार्ले स्थानकातून विमानतळावर जाण्यासाठी रस्तेमार्गे 20 ते 30 मिनिटांचा वेळ लागतो. पण मेट्रो-7A  या मार्गावर सेवा सुरू होताच हे अंतर 8-10 मिनिटांवर येणार आहे. अंधेरी स्थानकातून 8 मिनिटांचा वेळ लागणार आहे. तसंच, ही मेट्रो मार्गिका मुंबई विमानतळासोबत मिरा-भाईंदर शहरास मेट्रो मार्ग 9 च्या सहाय्याने तर पश्चिम उपनगरांना मेट्रो मार्ग 2A आणि 7 च्या सहाय्याने थेट जोडते. मेट्रो 7A वर दोन स्थानके असणार आहेत 1 - एअरपोर्ट कॉलनी आणि  १  मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अशी दोन स्थानके असणार आहेत. मेट्रो मार्ग 7A चे काम ५९% पूर्ण झाले असून प्रवाशांचा सुरक्षित, आरामदायी व सुलभ प्रवास.

मेट्रो 7A प्रकल्पामुळे मेट्रोची कोणती जाळी  विणली जाणार?? 

मेट्रो 3 - कुलाबा बांद्रा सिप्झ

मेट्रो 2 B - डिएन नगर- मंडाले  

मेट्रो 7 अंधेरी ते दहिसर

मेट्रो 1 घाटकोपर ते वर्सोवा

मेट्रो 6 लोखंडवाला ते कांजुरमार्ग 

मेट्रो 4 ठाणे ते वडाळा 

मेट्रो 13 वसई विरार ते एअरपोर्ट

Read More