Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

देव तारी त्याला कोण मारी! मजुराने 13व्या मजल्यावरुन उडी घेतली; तरी बचावले प्राण, थरारक Video समोर

Mumbai Crime News Today: विक्रोळीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मजुराने इमारतीच्या 13 व्या मजल्यावरुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

देव तारी त्याला कोण मारी! मजुराने 13व्या मजल्यावरुन उडी घेतली; तरी बचावले प्राण, थरारक Video समोर

Mumbai Crime News Today: विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये बुधवारी एक थरारक घटना घडली आहे. बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या 13व्या मजल्यावरुन एका मजुराने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने त्याचा जीव वाचला आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला वाचवण्यात आलं आहे. या प्रकरणी विक्रोळी पोलिस अधिक तपास करत आहेत. 

आयुष्याला कंटाळून अनेकजण आपली जीवनयात्रा संपवण्याच्या मनःस्थितीत येतात. आत्महत्या करण्याचा विचार मनात येतो आणि तस करायलादेखील जातात पण देव तारी त्याला कोण मारी, अशी म्हण पुन्हा एकदा सिध्द झाली आहे. त्याच झालं अस की विक्रोळी च्या कन्नमवार नगर भागात ५७ क्रमांकाच्या इमारतीच बांधकाम सुरू आहे. याच ठिकाणी काम करणारा कामगाराने इमारतीवरून आत्महत्या करण्यास उडी मारली. हा कामगार १३ व्या मजल्यावरून उडी मारूनही तीन वेळा सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या जाळ्यांमद्ये अडकून ही सुरक्षित राहीला. 

बिरजूप्रसाद रमेश बनरवा असे या कामगाराचे नाव असून तो काही दिवसांपासून मानसिक तणावात होता. काल तो काम करीत असलेल्या ५७ क्रमांकाच्या इमारतीच्या तेराव्या मजल्यावर गेला तिथून त्याने खाली उडी मारली. परंतु तो आठव्या मजल्यावर लावण्यात आलेल्या जाळीत अडकला. तिथून ही त्याने उडी मारली तर तिसऱ्या मजल्यावरील जळीत अडकला तिथूनही उडी मारल्यावर खाली लोकांनी पकडलेल्या जाळीत पडला आणि त्याचा जीव वाचवला. 

बिरजूप्रसाद रमेश बनरवा त्याला वाचवण्यात आल्यानंतर त्याला त्याच्या उत्तरप्रदेश मधील गोरखपूर गावी परत पाठविण्यात आले आहे. मात्र जेव्हा हा प्रकार घडला तेव्हा मात्र बघ्यांची गर्दी जमली होती. हा तरुण आता सुखरुप असून त्याला त्याच्या घरी पाठवून देण्यात आलं आहे. 

या घटनेचा व्हिडिओ देखील चांगलाच व्हायरल झाला आहे. यात तरुण संरक्षण जाळीवर लटकलेला दिसत आहे. त्यानंतर काय झालं हे पाहण्यासाठी इतर मजुरही बाहेर आले. त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. पहिल्या मजल्यावरही एक संरक्षण जाळी लावण्यात आली त्यावर त्याने उडी घेतली. संरक्षण जाळ्या लावण्यात आल्यामुळं या मजुराचा जीव बचावला आहे. 

Read More