Holi 2025 : होळी आणि रंगपचमीला मुबई पालिसांकडून कडक नियमावली जाहीर करण्यात आली आहे. होळीच्या पार्टीत अश्लील शब्दातील गाणी गाण्यांवर प्रतिबंध असणार आहे. तसेच अनोळखी लोकांवर रंग किंवा पाणी फेकणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. यासोबतच समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य करू नये, अशी सूचना मुंबई पोलिसांनी दिली आहे. 12 मार्च ते 18 मार्च 2025 पर्यंत हे नियम लागू राहणार आहेत.
13 मार्च आणि 14 मार्च या दोन्हीही दिवशी होळी आणि धुलिवंदन साजरा केला जाणर आहे. मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडून एक प्रसिद्ध पत्रक जारी करण्यात आले आहे. यात होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमीसाठी मुंबई पोलिसांनी नियमावली जारी केली आहे. या नियमावलीचे पालक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
होळी , धुलीवंदन आणि रंगपंचमी सण 12 मार्च ते 18 मार्च या कालावधीत साजरा केला जात आहे. सार्वजनिक ठिकाणी अंधाधुंदपणे रंगीत पाणी शिंपडणे आणि अश्लील बोलणे यामुळे जातीय तणाव आणि सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता असते. मी सार्वजनिक शांतता भंग होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
जो कोणी आदेशाचे उल्लंघन करेल किंवा आदेशाचे उल्लंघन करण्यास मदत करेल त्याला महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 135 नुसार शिक्षा केली जाईल. होळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही प्रकारची वृक्षतोड करू नये. अनधिकृत वृक्षतोड झाल्याचे आढळून आल्यास याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येईल, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कळविण्यात येत आहे. अनधिकृत वृक्षतोडीच्या प्रत्येक गुन्ह्यासाठन संबंधित व्यक्तिला कमीत कमी रुपये 1 हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्याची तरतूद आहे. त्यासह एक आठवडा ते एक वर्षापर्यंत कैदेची शिक्षा देखील होऊ शकते.