Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

महाराष्ट्रातील दोन श्रीमंत शहरांना जोडणारी भारतातील सर्वात लोकप्रिय ट्रेन; 96 वर्षांपासून धावणाऱ्या या ट्रेनचे नाव जाणून शॉक व्हाल

भारतात 96 वर्षांपासून धावणारी एक लोकप्रिय आहे ट्रेन आहे. ही ट्रेन  महाराष्ट्रातील दोन श्रीमंत शहरांना जोडते. 

महाराष्ट्रातील दोन श्रीमंत शहरांना जोडणारी भारतातील सर्वात लोकप्रिय ट्रेन; 96 वर्षांपासून धावणाऱ्या या ट्रेनचे नाव जाणून शॉक व्हाल

Mumbai Pune Deccan Queen Express : भरतीय रेल्वेचे जाळे देशाच्या कानाकोपऱ्यात पसरलेले आहे. देशातील विविध शहरांना जोडणाऱ्या अनेक ट्रेन धावतात. मात्र,  महाराष्ट्रातील दोन श्रीमंत शहरांना जोडणारी एक ट्रेन आहे जी भारतातील सर्वात लोकप्रिय ट्रेन आहे. 95 वर्षांपासून धावणाऱ्या या ट्रेनचे नाव काय? ही ट्रेन महाराष्ट्रातील कोणत्या शहरांना जोडते जाणून घ्या सर्वकाही. 

फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारतात  लोकप्रि. असलेलली ही ट्रेन दख्खनची राणी म्हणून ओळखली जाते. या सर्वात लोकप्रिय ट्रेनचे नाव आहे डेक्कन क्वीन. या ट्रेनला सुरू होऊन आज 96 वर्ष पूर्ण झाली आहे.  पुणे, आणि मुंबई या दोन मेट्रो शहराला जोडणारी भावनिक दुवा असलेली ही ट्रेन अनेक पिढ्यांच्या आठवणींची साक्षीदार आहे. मध्य रेल्वेच्या सर्वात प्रतिष्ठित आणि लोकप्रिय ट्रेन पैकी एक असलेल्या डेक्कन क्वीनच्या वाढदिवसा निमित्त दरवर्षी प्रमाणे यंदा सुद्धा सेलिब्रेशन जोरदार केले गेले. 

पुणे रेल्वे स्टेशन वर आज केक कापून उत्साहात डेक्कन क्वीन’चा वाढदिवस साजरा करण्यात आला. या निमित्ताने गाडीच्या इंजिनला हार व फुलांनी सजविण्यात आले होते. 1 जून 1930 रोजी सुरू झालेला ‘डेक्कन क्वीन’चा प्रवास आजही अव्याहतपणे सुरू असून मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची ती आजही पहिली पसंती आहे. 
देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि सांस्कृतिक राजधानी पुणेदरम्यान 1 जून 1930 रोजी ही रेल्वेगाडी धावू लागली. त्यावेळी ती 'ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे' (जीआयपीआर) मार्गावर धावत होती.  'डेक्कन क्कीन' चा इतिहास दोन शहरांची गोष्ट आहे. या रेल्वेगाडीच्या वक्तशीरपणामुळे मुंबई आणि पुण्यातील प्रवासी समाधानी आहेत. गेल्या ९५ वर्षांमध्ये इतिहासात ही रेल्वेगाडी दोन शहरांमधील प्रवाशांसाठी महत्त्वाचा दुवा बनली आहे. या दोन महत्त्वाच्या शहरांना सेवा देणारी ही पहिली डिलक्स ट्रेन होती. त्यामुळे तिला 'डेक्कन क्वीन' असे नाव देण्यात आले. 

 

Read More