Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

तीन मित्र एकाचवेळी निघाले अखेरच्या प्रवासाला, पाहून सोलापूर हळहळलं

मुंबई -  पुणे एक्स्प्रेसवर खोपोलीजवळ बोरघाटात काल भीषण अपघात झाला होता, यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला

तीन मित्र एकाचवेळी निघाले अखेरच्या प्रवासाला, पाहून सोलापूर हळहळलं

सोलापूर : मुंबई -  पुणे एक्स्प्रेसवर खोपोलीजवळ बोरघाटात झालेल्या अपघातात 4 जण जागीच ठार झाले. मृतांमध्ये सोलापूरमधील तीन मित्रांचा समावेश होता. आज या तिनही मित्रांची एकाचवेळी अंत्ययात्रा निघाली, त्यावेळी संपूर्ण शहर हळहळलं. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्याप्रमाणात गर्दी झाली होती. (Mumbai-Pune Express Accident)

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर खोपोलीजवळ झालेल्या भीषण अपघातात गौरव खरात, सौरव तुळसे आणि सिद्धार्थ राजगुरु या तीन मित्रांचा मृत्यू झाला होता. मृत गौरव खरात हे काँग्रेस पक्षाशी संबंधित होते. नितीन राऊत यांना भेटण्यासाठी जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला होता. 

सोलापुरातील मोदी स्मशानभूमीत एकाचवेळी या तीन मित्रांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने सुशीलकुमार शिंदे, नितीन राऊत यांनी शोक व्यक्त केला आहे.

भीषण अपघातात चौघांचा मृत्यू
एका ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने 6 ते 7 वाहने एकमेकांना धडकली यात ट्रक आणि टेम्पोच्यामध्ये स्विफ्ट कारचा अक्षरशः चुराडा झाला. कारमधील चौघेही जागीच ठार झाले.  या अपघातात 5 जण किरकोळ जखमी झाले.  

Read More