Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

कल्याण- डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! अत्यंत वर्दळीचा 'हा' मार्ग 5 दिवस बंद, असे आहेत पर्यायी मार्ग

Shilphata to Kalyan Road Closed: अत्यंत वर्दळीचा असलेला कल्याण शिळफाटा रोड पाच दिवस वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. त्यामुळं प्रवाशांनी पर्यायी वाहतुकीचा मार्ग वापर करावा असं अवाहन करण्यात येत आहे. 

कल्याण- डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! अत्यंत वर्दळीचा 'हा' मार्ग 5 दिवस बंद, असे आहेत पर्यायी मार्ग

Shilphata to Kalyan Road Closed: कल्याण, डोंबिवली आणि अंबरनाथ परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. अत्यंत वर्दळीचा असलेला शिळफाटा रस्ता पाच दिवस बंद राहणार आहे. त्यामुळं नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे. निळजे रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी 5 ते 10 फेब्रुवारीदरम्यान विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. 

कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील पलावा जंक्शनजवळ निळजे रेल्वे उड्डाणपुलाचे काम ५ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीपासून ते १० फेब्रुवारीच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत केले जाणार आहे. त्यामुळे या कालावधीत शिळफाटा रस्त्यावर पलावा जंक्शनकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. यासंदर्भातची अधिसूचना शुक्रवारी प्रसिध्द केली जाणार आहे.

वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली जेएनपीटी समर्पित जलदगती रेल्वे मालवाहू विभागाचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. हा रेल्वे मार्ग शिळफाटा येथे पलावा जंक्शन एक्सपिरिया मॉलजवळील निळजे  रेल्वे उड्डाणपुलाखालून जाणार आहे. पुलाच्या पुनर्बाधणीचे काम सुरू करण्यात येणार आहे. वर्दळीत ही कामे करणे शक्य नसल्याने ५ ते १० फेब्रुवारी दरम्यान सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

असा आहे पर्यायी मार्ग!

- कल्याण भागातील प्रवाशांनी मोठागाव माणकोली उड्डाण पुलावरून इच्छित स्थळी प्रवास करावा. 

- शिळफाटामार्गे नवी मुंबई, पनवेलकडे जाणाऱ्या प्रवाशांनी काटई नाका येथे डावे वळण घेऊन बदलापूर पाईपलाईन मार्गे तळोजा रस्त्याने जावे. 

- बदलापूर, अंबरनाथ, कर्जतकडून येणाऱ्या वाहनांनी काटई नाका येवे न येता खोणी गावात वळण घेऊन तळोजा काँक्रीट रस्त्याने पनवेल, नवी मुंबईकडे जावे. 

- हलक्या, मध्यम वाहनांनी काटई गाव, काटई गाव कमान येथून लोढा पलावा दिशेने विरुध्द मार्गिकेतून जावे. तेथून पलावा जंक्शन येथे नियमित मार्गिकित येऊन इच्छित स्थळी जावे 

- बदलापूर, अंबरनाथ, कर्जतकडून येणाऱ्या वाहन चालकांनी काटई नाका येथे न येता खोणी गाव येथे खोणी गाव येथे वळण घेऊन तळोजा क्राँक्रीट रस्त्याने पनवेल, नवी मुंबईकडे जावे. 

या कालावधीत सर्व प्रकारच्या जड आणि अवजड वाहनांना या मार्गावरुन प्रवेश बंद राहणार आहे. दिलेल्या मार्गाशिवाय इतर मार्गाचा वापर वाहनांनी करु नये त्यासोबतच सूचनांचे पालन करण्याचे अवाहन ठाणे शहर वाहतूक नियंत्रण विभागातर्फे करण्यात आले आहे. 

Read More