Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

आता खरचं मुंबई ते गोवा प्रवास 6 तासांत होणार! रस्ते किंवा रेल्वेमार्गे नव्हे थेट समुद्रमार्गे अति जलद प्रवास

 Ro Ro Ferry: मुंबई ते गोवा प्रवास 6 तासांत होणार आहे. रस्ते किंवा रेल्वेमार्गे नव्हे थेट समुद्रमार्गे अति जलद प्रवास करता येणार आहे. 

आता खरचं मुंबई ते गोवा प्रवास 6 तासांत होणार! रस्ते किंवा रेल्वेमार्गे नव्हे थेट समुद्रमार्गे अति जलद प्रवास

Mumbai To Goa Ro Ro Ferry:  मुंबई गोवा महामार्ग.... महाराष्ट्रातील नेहमी चर्चेत असणारा मार्ग मागील 14 वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाचे काम रखडले आहे. त्यातच मुंबई महामार्गाला पर्याय म्हणून नविन कोकम एक्सप्रेस वे बांधला जात आहे. तर, कोकम रेल्वे मार्गावर अनेक सुपरफास्ट ट्रेन देखील सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र,आता खरचं मुंबई गोवा प्रवास 6 तासांत होणार आहे. रस्ते किंवा रेल्वेमार्गे नव्हे थेट समुद्रमार्गे अति जलद प्रवास करता येणार आहे. 

मुंबई ते गोवा हे अंतर 589 किमी इतके आहे. मुंबई ते गोवा या प्रवासाठी सध्या वाहतुकीचे दोन पर्याय आहेत. एक म्हणजे कोकण रेल्वे आणि दुसरा म्हणजे मुंबई गोवा महामार्ग. मुंबई गोवा महामार्गे प्रवासासाठी 10 ते 12 तास लागतात.   तर, रेल्वेने गेल्यास प्रवासासाठी 8 ते 9 तासांचा वेळ लागतो. मात्र, आता समुद्र मार्गे हाच मुंबई गोवा प्रवास फक्त 6 तासात शक्य होणार आहे. 

जल वाहतूक सेवा देणाऱ्या  एका खाजगी कंपनीच्या माध्यमातून मुंबई ते गोवा अशी रो रो बोट सेवा सुरु केली जाणार आहे. प्रवासी जहाजाच्या माध्यमातून प्रवाशांन मुंबई गोवा प्रवास करता येणार आहे. गोव्याला जाणारे हे खाजगी जहाज मुंबईतून निघेल. मुंबईतील माजगाव ते गोव्यातील मुरगाव दरम्यान अशी ही रो रो फेरी असेल. सुरुवातील प्रायोगीक तत्वातावर 60 प्रवाशांची क्षमता असलेल्या जहाजाच्या माध्यमातून ही रो रो सेवा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. या रो रो सेवेमुळे महाराष्ट्र आणि गोवा दोन्ही राज्यांच्या पर्यटनासाठी फायदा होणार आहे. मात्र, मुंबई गोवा जलवाहतूक कधी पर्यंत सुरु होईल याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. 

 

Read More