Bhandara News : महाराष्ट्रात एक रहस्यमयी घर सापडले आहे. घर बांधल्यानंतर 15 वर्षानंतर एक भुयारी मार्ग सापडला आहे. भंडारा जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. हा भुयारी मार्ग पाहून पुरातत्व विभागाचे अधिकारीही चक्रावले आहेत. हा भुयारी मार्ग पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे.
भंडारा जिल्ह्याच्या नांदोरा येथील गावातील एका घरात हा भुयारी मार्ग सापडला आहे. महादेव कोरचम यांचे हे घर आहे. महादेव कोरचम यांनी 2010 साली घर बांधले होते. 15 वर्षानंतर त्यांच्या घराच्या खाली भुयारी मार्ग मिळाला आहे. घराच्या आत एक छोटासा खड्डा पडला होता. त्याला त्यांनी थोडंसं खोदले आणि बांबू घालून पाहिले. बांबू घालून पाहिल्यावर बांबू आत पर्यंत गेला. शेवटी खोदकाम केले असता अचानक घराच्या खाली भुयारी मार्ग आढळून आल्याने गावात खळबळ माजली आहे. या घटनेची माहिती जिल्हाधिकारी, पोलिस प्रशासन, पुरातत्व विभाग आणि तहसीलदार यांना दिली.
प्रशासनाच्या वतीने भेट देण्यात आली असली तरी प्रशासनाच्या वतीने कुठलेही प्रकरणाचे घटनेबाबत स्पष्टीकरण आलेले नाही. मात्र गावकऱ्यांच्या मते आधी तिथे विहीर असल्याचे सांगण्यात येत आहे. तरी आता प्रशासनाच्या वतीने घराच्या आत मध्ये काय आहे त्याचं शोध घेण्यात येणार आहे.