Patanjali 10 thousand Jobs: नागपूरमधील मल्टी-मॉडल इंटरनॅशनल कार्गो हब आणि विमानतळ परिसरात असलेले पतंजली मेगा फूड अँड हर्बल पार्क येत्या 9 मार्च 2025 पासून कामकाज सुरू करण्यासाठी सज्ज झाले आहे. नागपूरमध्ये बांधल्या जाणाऱ्या पतंजली मेगा फूड अँड हर्बल पार्कचा शेतकऱ्यांना थेट फायदा होईल. यासोबतच रोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.
सुरुवातीच्या टप्प्यात या पार्कमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे साधारण 500 लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आले आहेत. असे असले तरी भविष्यात ही संख्या 10 हजारपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
या फूड पार्कमध्ये फळे आणि भाज्यांवर प्रक्रिया करण्यासाठी अत्याधुनिक मशीन बसवण्यात आल्या आहेत. यामुळे विविध प्रकारचे उत्पादन तयार होणार आहे. येथे उत्पादित होणाऱ्या उत्पादनांची जागतिक मागणी लक्षात घेता स्थानिक तरुणांना प्रशिक्षित करून रोजगार दिला जाणार असल्याची माहिती पार्कच्या वतीने देण्यात आली आहे.
पतंजलि मेगा फूड हर्बल पार्क भविष्यात शेतकऱ्यांसाठीदेखील फायदेशीर ठरेल. पतंजली शेतकऱ्यांकडून थेट उत्पादने खरेदी करून त्यांना स्थिर आणि योग्य बाजारपेठ उपलब्ध करुन देणार आहे. यावेळी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती आणि माती परीक्षणसारख्या सुविधादेखील पुरविल्या जाणार आहेत.
हे मेगा फूड पार्क केवळ नागपूरसाठीच नव्हे तर संपूर्ण विदर्भासाठी परिवर्तनाचे आर्थिक केंद्र बनेल. हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला जाईल. तसेच प्रादेशिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
(Disclaimer - This article is part of India Dotcom Pvt Lt’s consumer connect initiative, a paid publication program IDPL claims no editorial involvement and assumes no responsibility or liability for any errors or omissions in the content of the article.)