Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

नागपूरच्या एटीएममध्ये लागतेय लॉटरी

एटीएममध्ये 500 रुपयांचा आकडा टाकल्यानंतरही अधिक पैसे विड्रॉ झाले.

नागपूरच्या एटीएममध्ये लागतेय लॉटरी

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : हेरा फेरीमधील बाबू भैय्याचा तो  डायलॉग आठवतोय का? उपरवाला छप्पर फाडकर देता है. असाच काहीसा प्रकार नागपूरच्या खापरखेडामध्ये घडला आहे. एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेला तरुणाला चक्क अधिकचे पैसे मिळाले आहेत. या घटनेमुळे एटीएमच्या बाहेर तरुणांची मोठी रांग लागली होती.  

नेमकं काय घडलं?

तरुण 500 रुपये काढण्यासाठी एटीएममध्ये गेला होता. मात्र एटीएममध्ये 500 रुपयांचा आकडा टाकल्यानंतरही अधिक पैसे विड्रॉ झाले. 500 टाकल्यानंतरही एटीएममधून 2500 रुपये बाहेर आले. जास्त पैसे आल्याची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली. आणि मग काय सगळ्या तरुणांनी थेट एटीएम गाठलं. धनलाभ देणाऱ्या अॅक्सिस बँकेच्या एटीएममधून खरोखरच 500 रुपयांचा आकडा टाकल्यानंतरही 2500 रुपये बाहेर पडत होते. 

पोलिसांना मिळाली माहिती - 

धनलाभ देणाऱ्या एटीएमची माहिती पोलिसांना आणि बँकेच्या अधिकार्‍यांना मिळाली. मात्र तोपर्यंत अनेक तरुणांनी पैसे काढल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी एटीएम गाठून एटीएमचे शटर बंद केले.

पोलिसांनी बँक अधिकाऱ्यांना दिली माहिती - 

पोलिसांनी बँकेच्या अधिकार्‍यांना माहिती दिल्यानंतर बँक अधिकाऱ्यांनी तिथे पोहोचून एटीएम मशीनची तपासणी केली.तांत्रिक चुकीमुळे एटीएम मधून 500 रुपयेचा आकडा टाकल्यावर 2500 रुपये बाहेर येत असल्याचे माहिती समोर आहे. दरम्यान किती जणांनी या तांत्रिक अडचणीचा लाभ घेतला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

Read More