Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

AXIS BANK प्रकरणी देवेंद्र फडणवीसांना उच्च न्यायालयाची नोटीस

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं नोटीस बजावली आहे.

AXIS BANK प्रकरणी देवेंद्र फडणवीसांना उच्च न्यायालयाची नोटीस

नागपूर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं नोटीस बजावली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचं वेतन खातं इतर बँकेतून अॅक्सिस बँकेत वळविल्याच्या प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे.

फडणवीस यांच्यासह राज्याचे मुख्य सचिव, गृह विभागाचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांनाही खंडपीठांना नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसला आठ आठवड्यांत उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अॅक्सिस बँकेत खाते वळवल्याप्रकरणी मोहनिष जबलापुरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या अॅक्सिस बँकेत नोकरीला आहेत. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा गैरवापर करुन सरकारी कर्मचाऱ्यांचं वेतन इतर बँकांमधून अॅक्सिस बँकेत वळवल्याचा आरोप विरोधकांनी याआधाही केला होता.

Read More