Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

पत्नीची हत्या केली आणि... नागपुरातील डॉक्टरचे भयानक कृत्य पाहून पोलिसही हादरले

 नागपुरात एका डॉक्टरने आपल्या पत्नीची हत्या केली आहे. पोलिस तपासात हत्येमागे अत्यंत धक्कादायक कारण समोर आले. 

पत्नीची हत्या केली आणि... नागपुरातील डॉक्टरचे भयानक कृत्य पाहून पोलिसही हादरले

Nagpur Crime News : नागपुरात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. एका डॉक्टरने भावाच्या मदतीने आपल्या पत्नीची हत्या केली आहे. पोलिस तपासात हत्येमागे अत्यंत धक्कादायक कारण उघडकीस आले आहे. पत्नीची हत्या का केली? डॉक्टरने हत्येची कबुली देताना जे कारण सांगितले ऐकून पोलिसही हादरले आहेत. 

नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर अर्चना राहुले(50 वर्ष) यांची हत्या त्यांच्या पतीने भावाच्या मदतीने केल्याची धक्कादायक माहिती तपासात उघडकिस आली

डॉ अनिल राहुले(52 वर्ष) यांनी भाऊ राजू(59 वर्ष) अशी आरोपींची नावे आहेत.  सोबत मिळून कट रचून त्यांनी डॉक्टर अर्चना राहुले यांची हत्या केली. डॉ अनिल यांनी भावाच्या मदतीने रॉडने वार करून डॉक्टर पत्नीचा खून केला.  हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लाडीकर लेआऊट येथे ही हत्येची घटना घडली. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी दोघांना अटक केलीय. 

डॉ अर्चना या नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात फिजिओथेरपि विभागात साहाय्यक प्राध्यापक होत्या. तर त्यांचे पती अनिल छत्तीसगड येथील रायपूर येथे मेडिकल इन्स्टिट्यूट मध्ये प्राध्यापक आहे . त्यांचा मुलगा तेलंगणा येथे एमबीबीएसच्या तृतीय वर्षाला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार डॉ अनिल अर्चनाच्य चारित्र्यावर संशय घ्यायचा. यावरून अर्चना आणि अनिल यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. 

यातूनच अनिलने आपल्या भाऊ राजूच्या मदतीने अर्चनाच्या हत्येचा कट रचला. 9 एप्रिलला अनिल भावासह घरी आला. त्या दोघांनी रॉडने अर्चनाच्या डोक्यावर वार करत हत्या केली आणि घराला लॉक लावून तेथून पसार झाले आणि 13 तारखेला रात्री घरी परत आले. जणू आपल्याला काही माहिती नसल्याचे बनाव करत अर्चनाचा मृतदेह पाहून रडायला सुरुवात केली. दरम्यान पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर त्यांना पती अनिल वर संशय आला पोलिसांनी चौकशी केल्यानंतर अनिल ने भावाच्या मदतीने पत्नीचा खून केल्याचे उघडकीस आले. 

 

 

Read More