Nagpur Crime News : महाराष्ट्रात एक अत्यंत भयानक घटना घटना घडली आहे. नागपूरच्या घोडेस्वारी अकादमीत घोड्यावर बलात्कार झाल्याची हादरवणारी घटना समोर आली आहे. हा सर्व प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, मानसिक विकृता कळस पहायला मिळत आहे.
महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यात ही लज्जास्पद घटना घडली आहे. खाणी परिसरात असलेल्या घोडेस्वारी अकादमीमध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणी एका 30 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. छोटा सुंदर खोब्रागडे असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने जे कृत्य केले आहे ते पाहून सगळेच हादरले.
ही घटना 17 मे 2025 च्या रात्री घडली. अकादमीच्या सुरक्षा रक्षकाने आवारात एक संशयास्पद व्यक्ती पाहिली आणि अकादमी संचालकांना माहिती दिली. यानंतर, सीसीटीव्ही फुटेज तपासले असता हा सर्व प्रकार उघडकी आला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी घोड्यांचे लैंगिक शोषण करत असल्याचे दिसून आले.
घटनेला दुजोरा देताना, पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, या घृणास्पद कृत्याला गांभीर्याने घेत, आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी पोलिस कोठडीत आहे आणि तपास सुरू आहे.
प्राणी हक्क कार्यकर्त्यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. हे प्रकरण केवळ कायदा आणि सुव्यवस्थेसाठी एक गंभीर आव्हान नाही तर समाजाच्या मानसिकतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करते. आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी प्राणी हक्क कार्यकर्त्यांनी केली आहे.