Nagpur Crime: पुण्याच्या येरवडा भागातल्या शास्त्रीनगर चौकात गौरव अहुजाचा व्हिडीओ व्हायरल झाला. दारुच्या नशेत तो अश्लिल चाळे आणि रस्त्यावरील दुभाजकावर लघुशंका करताना दिसला. याकृतीनंतर गौरव अहुजा आणि त्याच्या वडिलांनीदेखील माफी मागितली होती. पण असे प्रकार काही थांबताना दिसत नाहीयत. पुण्यानंतर आता नागपूरमध्ये असाच एक प्रकार घडलाय.
नागपुरात भररस्त्यात विकृतीचा कळस पाहायला मिळाला. येथे एक तरुण अश्लील चाळे करतानाचा व्हिडिओ समोर आलाय. वर्धा मार्गावरील मध्यवर्ती कारागृहाजवळील मार्गालगतच्या जॉगिंग ट्रॅकवरील बेंचेसव तरुणी बसल्या होत्या. या विकृत तरुणाने तरुणींकडे पाहून
अश्लील चाळे सुरू केले. तरुण मुलीकडे पाहून हस्तमैथुन करत होता.
तेथे आणखी तरुणीदेखील बसल्या होत्या. दरम्यान त्यातील एका तरुणीने हिंमत दाखवून पोलिसांना फोन लावण्याची भाषा केली. यानंतर हा विकृत घटनास्थळावरुन पळून गेला. याप्रकरणी बजाज नगर पोलीस या अश्लील चाळे करणाऱ्या तरुणाचा शोध घेत आहेत.
काल रात्री नऊच्या सुमाराची घटना असल्याची माहिती आहे. दरम्यान धंतोली पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
गौरव अहुजा भररस्त्यात अश्लिल चाळे आणि रस्त्यावरील दुभाजकावर लघुशंका करताना दिसला. गौरव अहुजा आणि भाग्येश ओसवालची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. ओसवालच्या वैद्यकीय तपासणीत अल्कोहोलचं प्रमाण असल्याचं आढळलं आहे. मात्र गौरवचा मेडिकल रिपोर्ट अद्याप बाकी आहे. दुपारनंतर गौरवला शिवाजीनगर कोर्टात हजर करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अश्लील कृत्य केल्याप्रकरणी गौरव अहुजा आणि भाग्येश ओसवाल यांना पुणे पोलिसांनी आता अटक केली आहे. यात भाग्यश ओसवालच्या मेडिकलमध्ये अल्कोहोलचे प्रमाण आढळलं आहे. दरम्यान गौरवने व्हिडीओ जारी करत याप्रकरणी माफी मागितली.