Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'माझ्या फेसबुकवरुन अश्लील कंटेंट...'; ...अन् प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर जोरजोरात रडू लागले

Vishnu Manohar Crying: यावेळेस बोलताना प्रसिद्ध शेफ असलेल्या विष्णू मनोहर यांना अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले. 

'माझ्या फेसबुकवरुन अश्लील कंटेंट...'; ...अन् प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर जोरजोरात रडू लागले

Vishnu Manohar Crying: प्रसिद्ध शेफ विष्‍णू मनोहर यांचे मास्टर रेसिपी फेसबुक अकाऊंट हॅक झाले आहे. त्यांच्या हॅक झालेल्या फेसबुक पेजवरून अश्लील व्हीडिओ पोस्‍ट केले जात असून याप्रकरणी विष्‍णू मनोहर यांनी सायबर क्राईम विभागाकडे तसेच फेसबुक व्यवस्थापनाला तक्रार दाखल केली आहे. 

अश्रू अनावर

सोमवारी याबाबत माहिती देताना विष्णू मनोहर यांनी हॅकर माझ्या फेसबुक पेजवरून अश्लील कंटेंट पोस्ट करत आहे असं सांगितलं. यामुळे माझ्या प्रतिमेला तडे जात असून बदनामी होत असल्याची खंतही विष्णू मनोहर यांनी व्यक्त केली आहे. तब्बल साडेचार लाखांपेक्षा जास्त फॉलोवर्स राहिलेल्या या पेजवरून दीड लाख फॉलोवर्स कमी झाल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना विष्णू मनोहर यांना अश्रू अनावर झाले. 

35 वर्षापासून कार्यरत

विष्णू मनोहर यांनी मागील 35 वर्षापासून पाककला क्षेत्रात कार्यरत असून त्‍यांचे मास्टर रेसिपी युट्यूब चॅनेल आहे. या चॅनेलवरून ते विविध मराठी पाककृतींचे व्हिडीओ पोस्‍ट करत असतात. याशिवाय, फेसबुकवर या चॅनेलचे पेज देखील आहे. तेथेही ते रेसिपीचे व्हिडिओ पोस्‍ट केले जातात. विविध पदार्थ तयार करण्‍याचे कौशल्‍य दर्शकांना आत्‍मसात करता यावे तसेच खाद्य संस्‍कृती लोकांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने आम्‍ही हे चॅनेल सुरू केले आहे. या माध्‍यमातून मराठी पदार्थांचा प्रचार व प्रसार व्‍हावा, हा आमचा उद्देश असल्याचे ते सांगतात.

हॅकर मॅक्सिकोमधील असल्याचा संशय

काही दिवसापूर्वी कोणीतरी विष्णू मनोहर यांचे फेसबुक अकाऊंट हॅक केले असून त्‍याद्वारे अश्लील व्हिडीओ पोस्‍ट करत आहे. असा प्रकार यापूर्वीही घडला असून त्‍याचा आम्‍ही वेळीच बंदोबस्‍त केला होता. परंतु, यावेळीदेखील हे अकाऊंट हॅक झाल्‍यामुळे खाद्यप्रेमी आणि चाहत्‍यांना भरपूर मनस्‍ताप होत आहे. शिवाय विष्णू मनोहरी यामुळे गेल्या काही दिवसांपासून तणावात आहे. हॅकर मॅक्सिकोतील असल्याचा संशय ही यावेळी विष्णू मनोहर यांनी व्यक्त केला आहे. विष्णू मनोहर यांच्या नावावर अनेक विक्रम असून ते आपल्या रेसिपीच्या माध्यमातून घरोघरात पोहोचले आहेत.

Read More