Nagpur Girl critically injured in Manali Zipline : महाराष्ट्रातील मुलीचा मनालीत भयानक अपघात झाला आहे. झिपलाईनवर असताना बेल्ट तुटला आणि ही तरुणी 30 फूट खोल दरीत पडली. या अपघातात ही मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
झिपलाईनवरून 30 फूट खोल खाली कोसळल्याने एक मुलगी गंभीर जखमी झालीय. नागपूरमध्ये राहणारी त्रिशा बिजवे ही थोडक्यात बचावली. त्रिशा झिपलाईनवर असताना बेल्ट तुटल्याने ती 30 फूट खोल खाली पडली. यात ती गंभीर जखमी असून तिच्या पायाला अनेक फ्रॅक्चर झाले आहेत. नागपूरचे रहिवासी असलेले प्रफुल्ल बिजवे हे उन्हाळी सुट्टीसाठी पत्नी आणि मुलीसोबत मनाली इथे गेले होते. यावेळी ही दुर्घटना झाली.
पर्यटन स्थळी साहसिक खेळांमध्ये पुरेशी सुरक्षा नसल्यास काय घडते हे नागपूरच्या या मुलीसोबत मनालीत घडले आहे. झिप लाइनरवर असताना बेल्ट तुटल्याने त्रिशा 30 फूट खाली पडली. आता तिच्या कुटुंबाने व्हिडिओ शेअर केला आहे. रविवारी, 8 जूनची घटना आहे. कुटुंबाने म्हटले आहे की तिथे पुरेशी सुरक्षा व्यवस्था नव्हती. कुटुंबाला तिथे कोणतीही मदत मिळाली नाही. त्रिशावर सुरुवातीला मनाली, नंतर चंदीगडमध्ये उपचार करण्यात आले. सध्या त्रिशावर नागपूरमधील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.