Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

नागपूरमध्ये काळवीटाची शिकार

 काळवीटाची शिकार छऱ्याच्या बंदुकीने करण्यात आल्याचा संशय आहे.

नागपूरमध्ये काळवीटाची शिकार

नागपूर: वन्य प्राण्यांच्या शिकारीस कायद्याने बंदी आहे. पण, तरीही वन्य प्राण्यांच्या शिकारीस आळा बसत नसल्याचे पुढे येत आहे. नागपूर जिल्ह्यातील नगरधन-मानपूर मार्गावजवळ काळवीटाची शिकार झाल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कामठीतील शेतात काळवीट मृत अवस्थेत आढळून आले.

दरम्यान, मंगळवारी रात्री चार जण नगरधन परिसरात संशयास्पद फिरताना स्थानिकांना दिसले. संशयास्पद हालचालीमुळे गावकऱ्यांनी त्यांना पकडून पोलिसात दिलं. मात्र, पोलिसांनी चौकशी करून त्यांना सोडून दिले. नगरधन परिसरात एका शेतात काळवीटाची शिकार झाल्याचे सकाळी उघडकीस आले.  नागरिकांनी याप्रकरणी  संशयास्पद फिरणाऱ्या त्या  तरुणांवर  संशय व्यक्त केला. काळवीटाची शिकार छऱ्याच्या बंदुकीने करण्यात आल्याचा संशय आहे.

Read More