Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

महालक्ष्मी मंदिरात चोरी, मंगळसूत्र आणि दानपेटी फोडली

नागपुरातील जयप्रकाश नगर येथील महालक्ष्मी मंदिरात रात्री चोरट्यांनी  महालक्ष्मीचं मंगळसूत्र आणि दानपेटी फोडल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

महालक्ष्मी मंदिरात चोरी, मंगळसूत्र आणि दानपेटी फोडली

नागपूर : नागपुरातील जयप्रकाश नगर येथील महालक्ष्मी मंदिरात रात्री चोरट्यांनी  महालक्ष्मीचं मंगळसूत्र आणि दानपेटी फोडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. रविवारी रात्री अकरापर्यंत महालक्ष्मी मंदिरात कार्यक्रम सुरु होता. त्यानंतर आज पहाटेच्या सुमारास मंदिराचे पुजारी आले असता त्यांना तिथे चोरी झाल्याचे लक्षात आले.  चोरीची ही घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे. चोरटे दानपेटी फोडताना सीसीटीव्हीत दिसत आहेत.

चोरट्यांचा धुमाकूळ

रात्री एकनंतर हे चोरटे मंदिर परिसरात वावरत असताना सीसीटीव्हीत दिसत आहेत.

सुमारे एक ते दीड तास त्यांचा मंदिर परिसरातील त्यांचा वावर होता.

दरम्यान चोरटे दानपेटी फोडताना आणि तसेच मंदिर परिसरातील काही सीसीटीव्ही कॅमेरे तोडताना सीसीटीव्हीत दिसत आहे.

नागपुरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे.

आता या घटनेमुळे पोलिसांच्या गस्त कुठे सुरु असते असा सवाल सर्वसामान्य विचारत आहे. सोनेगाव पोलीस याप्रकरणी तपास करीत आहे.

Read More