Nagpur Crime News: नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. नागपूर जिल्ह्याच्या कन्हान येथील 19 वर्षीय तरुणीने गळफास घेत आत्महत्या केली. 8 जून रोजी अंकिताने आत्महत्या केली. त्यानंतर शवविच्छेदनानंतर अंकितावर अत्यंसंस्कार सुरू होता. अत्यंसंस्कार सुरू असतानाच तिच्या प्रियकराने तिच्या सरणावर जाऊन उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. अनुराग मेश्राम असं या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंकिताचे अत्यंसंस्कार सुरू असताना अनुरागने अचानक तिच्या सरणावर उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. तेव्हा अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरिकांनी अनुराग मेश्रामला चांगलाच चोपला. अनुराग सध्या कामठी परिसरात एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
अंकिता आणि अनुराग हे एकाच गावातील असून त्या दोघांमध्ये मैत्री होती. या मैत्रीच्या वाटेत पुढे अडसर असल्याने अंकिताने राहत्या घरी रविवारी गळफास घेत आत्महत्या केली. यामध्ये अंकिताने लिहून ठेवलेल्या चिठ्ठी मध्ये माझ्या मृत्यूसाठी अनुराग मेश्रामला जबाबदार धरू नये आणि अनुरागला काहीही करू नये, असा उल्लेख केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे
अंकिताचे शवविच्छेदन पार पडल्यानंतर दुपारी चार वाजताच्या सुमारास अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती. तिच्यावर अंत्यविधी पार पाडत असताना अचानक अनुराग मेश्राम हा तिथे पोहोचला. त्याने सरणावर उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्नात होता. घटनेच्या माहितीनंतर अनुरागच्या वडील आणि भावांनी त्याला लगतच्या रुग्णालयात दाखल केले.
सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहे. सरणावर उडी घेत असताना त्याने कुठलेतरी द्रव्य प्राशन केले असल्याचा पोलिसांचा संशय आहे. वैद्यकीय अहवालानंतरच या सगळ्या बाबीचा खुलासा होणार असल्याची माहिती पुढे येत आहे.
चारित्र्यावर संशय घेतल्यामुळे एका विवाहितेने आत्महत्या केली आहे. सासरच्या जाचाला कंटाळून एरंडोल येथील विवाहितेने संपवली आपली जीवनयात्रा संपवली आहे. मनिषा सागर सोनार, वय ३४ वर्षे या विवाहित महिलेचे नाव आहे. याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला मृत महिलेचे भाऊ मनोज माधवराव पोतदार यांनी फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. मनिषा हीचा सागर पल्लीवाळ (सोनार) यांच्याशी 2014 मध्ये विवाह झाला होता, त्यांना शर्विल नावाचा 9 वर्षांचा मुलगा आहे. सागर पल्लीवाळ हा पुणे येथे नोकरीस असून तो पुण्यातच राहतो. सासरी सातत्याने सासरच्या मंडळींकडून त्यावर संशय घेत असल्याच्या जाचाला कंटाळून तिने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.