Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

प्रियकराच्या मदतीनं दत्तक मुलीनंच केली आई-वडिलांची हत्या

विदर्भ संघाच्या क्रिकेटरचा हत्येत सहभाग

प्रियकराच्या मदतीनं दत्तक मुलीनंच केली आई-वडिलांची हत्या

नागपूर : नागपूरच्या वृद्ध दाम्पत्याच्या हत्या प्रकरणाचा उलगडा झालाय. या हत्याकांडाप्रकरणी पोलिसांनी वृद्ध दाम्पत्याच्या मुलीला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. प्रियंका असं आरोपी मुलीचं तर मोहम्मद इकलाख असं तिच्या प्रियकराचं नाव आहे. 

आरोपी मुलगी प्रियंका चंपाती दाम्पत्याची दत्तक मुलगी असून ती संगणक अभियंता आहे तर तिचा प्रियकर मोहम्मद इखलाख हा क्रिकेटर असून त्यानं विदर्भ संघातर्फे क्रिकेट सामने खेळले आहेत.

दोघांच्या विवाहाला चंपाती दाम्पत्याचा विरोध असल्यानं स्वतःच्याच आई वडिलांची प्रियकराच्या मदतीनं हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आलीय. हत्येपूर्वी दोन्ही आरोपींनी वृद्ध दाम्पत्याला गुंगीचं औषध देऊन अवजड वस्तूनं प्रहार करून खून केला. गुन्हे शाखा पोलीस याबाबतीत अधिक तपास करीत आहेत.

Read More