Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

उपचारासाठी दाखल केलेला कैदी रुग्णालयातून पळाला

 कैद्याने रुग्णालयातून पलायन केल्याची धक्कादाय घटना नागपुरात घडली

उपचारासाठी दाखल केलेला कैदी रुग्णालयातून पळाला

नागपूर : रुग्णलयात उपचारासाठी दाखल केलेल्या कैद्याने रुग्णालयातून पलायन केल्याची धक्कादाय घटना नागपुरात घडली आहे. नागपूरच्या सुपर स्पेशियालिटी रुग्णालयातील आज सकाळी साडे नऊ वाजता हा प्रकार घडला. पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत असून कैद्याचा कसून शोध घेतला जात आहे. 

रुग्णालयातून पळालेल्या या कैद्यास अपहरणाच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्याला त्याच्या दुष्कृत्यासाठी तुरुंगवास सुनावण्यात आला. पण आजारपणामुळे त्याला रुग्णालयात दाखल केले होते. मात्र आज सकाळी तो कुणाला ही न सांगता रुग्णालयातुन पसार झाला आहे. ही वार्ता समजताच परिसरात खळबळ उडाली आहे. यावर पहारा ठेवणारे पोलीस तेव्हा कुठे होते ? याला पळवण्यात कोणी सहकार्य केले का ? याचा शोध घेतला जात आहे. 

Read More