Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

खबरदार..झाडांवर खिळे ठोकाल तर होईल गुन्हा दाखल

महापालिकेला आली जाग,झाडांच्या वेदनेकडे अखेर गेले लक्ष

खबरदार..झाडांवर खिळे ठोकाल तर होईल गुन्हा दाखल

नागपूर -झाडांवर खिळे ठोकणा-याविरुद्ध नागपूर महानगर पालिका कठोर पाऊले उचलणार आहे. शहरात अनेक ठिकाणी झाडांवर खिळे ठोकून जाहीरात,पोस्टर लावण्यात आलेले आहे.त्याला लगाम बसावी तसेच  झाडांच्या वेदनांवर मलम लावण्याच्या दृष्टीनं महापालिका झाडांवर खिळे ठोकणा-यांवर आता गुन्हे दाखल करणार आहे.शिवाय ज्या ठिकाणी खिळे ठोकून झाडांवर जाहीरात लावण्यात आलेल्या आहे त्या काढण्यास तीन दिवसांची मुदतही देण्यात आली आहे.
      नागपूरची ग्रीन सिटी म्हणून देशात वेगळी ओळख आहे.नागपूर शहराचे सौंदर्यीकरण आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने नागपुरात मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या कडेला  झाडांची लागवड करण्यात आली. आहे.मात्र शहरातील अनेक भागांमध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांवर जाहिरातदार खिळे  ठोकून जाहिराती पत्रके लावलेली दिसतात. खिळे ठोकल्याने झाडांना इजा व नुकसान  करण्यात आल्याचं दिसून येतं. याबाबत पर्यावरण प्रेमींनी अनेक तक्रारी केल्या आहे. धक्कादायक म्हणजे गेल्या पाच वर्षात ५ हजार २७४ झाडं कापण्यात आल्याच वास्तव पण समोर आलं आहे.त्यामुळं पर्यावरणाच्या दृष्टीनं घातक वास्तव समोर आलं आहे.त्यामुळं मनपा प्रशासनानं आता पर्यावरणाच्या दृष्टीनं कठोर पाऊल उचलणे सुरु केले आहे. त्यादृष्टीनं झाडांवर खिळे ठोकणा-यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.

खिळे ठोकून लावलेल्या जाहीराती काढण्यास ३ दिवसांची मुदत

 पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने आपली जबाबदारी ओळखून तीन दिवसात आपल्या जाहिराती काढण्याबाबत आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी केले आहे .यानंतर हे खिळे ठोकून जाहिराती आढळल्यास संबंधित जाहिरातदारा विरोधात मनपातर्फे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे

Read More