Nanded Crime News : सोशल मिडियाचा गैरवापर केल्याचे प्रकार केल्याचे प्रकार नेहमीच घडत आहेत. याच सोशल मिडियामुळे एका गुन्हेगाराला अटक झाली आहे. नांदेडमध्ये रिक्षाने प्रवास करणाऱ्या या महिलेला अत्यंत धक्कादायक अनुभव आला. या महिलेने सोशल मिडियावर पोस्ट शेअर केली. यानंचर काही तासांत आरोपीला अटक झाली.
नांदेडमध्ये प्रवासी महिलेसोबत गैरवर्तन करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक करून विक्रमी वेळेत 18 तासात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. नांदेड शहरातील एक महिला 7 जुलै रोजी वजीराबाद चौकातून ऑटोमध्ये बसून प्रवास करत होती. महिला ऑटोत बसल्यापासून ऑटोचालक तिच्याशी गैरवर्तन करू लागला. चालकाने त्याचा आरसाही महिलेच्या दिशेने वळवला होता.
अखेर महिलेने आपला प्रवास अर्ध्यावर थांबवला. श्रीनगर मध्ये ती महिला उतरली. महिलेने त्या ऑटोचा नंबरसह फोटो काढला. घडलेल्या प्रकराबाबत तिने इंस्टाग्राम वर पोस्ट टाकली. ही पोस्ट पाहणाऱ्या एका जबाबदार व्यक्तीने थेट पोलीस अधीक्षकांना ही पोस्ट फॉरवर्ड केली. पोलीस अधीक्षकांनी महिलेचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलीसांनी आधी त्या महिलेचा शोध घेतला. संपूर्ण हकीकत कळाल्यानंतर भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. काही तासाच्या नवी आबादी येथील 24 वर्षीय शेख इम्रान शेख हरून ला याला अटक करण्यात आली. काही तासात सबळ पुरावे गोळा करत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अवघ्या 18 तासात न्यायालयात पोलिसांनी दोषारोप पत्र दाखल केले.
नाशिकच्या उंटवाडी परिसरात असलेल्या बालसुधागृहातून 16 वर्षीय मुली बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. मुलीच्या नातेवाईकांनी शहरातील मुंबई नाका पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी आले आहे. जिल्ह्यातील वावी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे कुटुंब राहत या कुटुंबातील सोळा वर्षाच्या मुलीला एका तरुणाने 16 जूनला फूस लावून पळून नेण्याची घटना घडली होती. याबाबत वावी पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर 26 तारखेला या मुलीच्या नातेवाईकांनी नाशिकच्या उंटवाडी परिसरात असलेल्या बालसुधागृहांमध्ये या मुलीला महिनाभरासाठी ठेवलं होतं. मात्र तेथून ही मुलगी गायब झाली आहे. या मुलीच्या कुटुंबातील व्यक्तीने मुलगी विकल्याचा आरोप बालसुधारगृहावर लावला असून , बालसुधागृहात सीसीटीव्ही कॅमेरा असताना मुलगी गायब झालीच कशी असा देखील प्रश्न विचारला आहे. यानिमित्ताने नाशिकच्या बाल सुधार गृह च्या सुरक्षा वरती प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.