Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

प्रेमात अडसर ठरणाऱ्या तरुणाची हत्या, पोलिसांनी शिताफीने लावला छडा

विवाहित महिलेचे एका तरुणासोबत अनैतिक संबंध आहेत. त्याची माहिती एका तिसऱ्या व्यक्तीला मिळताच त्याला संपवण्याची योजना आखली जाते, असं अनेक क्राइम सीरियल किंवा सिनेमातील सीनमध्ये बघायला मिळतं. मात्र असाच धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये घडल्यानं खळबळ उडाली आहे. 

प्रेमात अडसर ठरणाऱ्या तरुणाची हत्या, पोलिसांनी शिताफीने लावला छडा

सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड: विवाहित महिलेचे एका तरुणासोबत अनैतिक संबंध आहेत. त्याची माहिती एका तिसऱ्या व्यक्तीला मिळताच त्याला संपवण्याची योजना आखली जाते, असं अनेक क्राइम सीरियल किंवा सिनेमातील सीनमध्ये बघायला मिळतं. मात्र असाच धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये घडल्यानं खळबळ उडाली आहे. 

32 वर्षीय विवाहित महिलेचं गावातील एका 23 वर्षीय अविवाहित तरुणावर प्रेम जडलं. मात्र याची माहिती गावातील जगदीश जाधव नावाच्या तरुणाला मिळाली. आपले अनैतिक संबंध अख्ख्या गावभर करेल या भीतीनं त्याचा बंदोबस्त करायला हवा असं दोघांनी ठरवलं. महिला आणि तिचा प्रियकर दोघांनी मिळून अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या जगदीशचा काटा काढला.

नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील कुडली गावात ही धक्कादायक घटना घडली. जगदीशला जीवे मारून दोघांनीही त्याचा मृतदेह गहू लावलेल्या शेतात फेकून दिला. 1 जानेवारीपासून बेपत्ता असलेल्या जगदीशच्या शोधात पोलीस होते. 

पोलिसांना मृतदेह गव्हाच्या शेतात मिळाल्यानंतर तपासाची चक्र फिरली आणि त्यांनी जगदीशला ठार मारणाऱ्या गुन्हेगारांचा शोध सुरू केला. मरखेल पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने हा गुन्हा उघडकीस आणला आहे. या प्रकरणी या प्रकरणी आरोपी शुभम चिलमपाडे आणि अनुसया गोंदे या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 

Read More