Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Crime News: कैद्यांचे कपडे घालून तरुणांचं रॅप साँग, पोलिसांनी दाखवल्या खाक्या; पाहा Video

Nanded  Rap song on Bhaigiri:  सध्या भाईगीरीविषयी तरुणांची क्रेझ वाढली आहे. नांदेड पोलिसांनी तीन तरुणांना अटक (Nanded Crime News) केल्याची माहिती मिळाली आहे. कैद्यांचे कपडे घालून भाईगीरीवर रॅप साँग बनवणाऱ्या दोघांना पोलीसांनी अद्दल घडवली.

Crime News: कैद्यांचे कपडे घालून तरुणांचं रॅप साँग, पोलिसांनी दाखवल्या खाक्या; पाहा Video

Nanded Crime News: गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील गुन्हेगारी (Criminality) वाढल्याचं चित्र आहे. पुण्यात (Pune Koyata Gang) कोयता गँग खुलेआम फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अशातच आता नांदेडमधून (Nanded News) धक्कादायक माहिती समोर आली आहे. सध्या भाईगीरीविषयी तरुणांची क्रेझ वाढली आहे. नांदेड पोलिसांनी तीन तरुणांना अटक केल्याची माहिती मिळाली आहे. कैद्यांचे कपडे घालून भाईगीरीवर रॅप साँग (Rap Song) बनवणाऱ्या दोघांना पोलीसांनी अद्दल घडवली.

नेमकं काय घडलं?

नांदेड जिल्ह्यात भाईगिरी करणारे व्हिडिओ (Rap Song Video) अपलोड करण्याचे प्रमाण वाढलंय. भाईगिरीवर रॅप साँग तयार करणाऱ्यांना नांदेड पोलीसांनी चांगलीच अद्दल घडवली. रॅप साँग बनवणाऱ्या युवकांना अटक करून त्यांच्या माफीचा व्हिडिओ काढून पोलीसांनी (Nanded Police) व्हायरल देखील केला. कैद्यांचे कपडे घालून तीन युवकांनी रॅप साँग तयार केले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांना खाक्या दाखवल्या.

एम एच 26 बोले तो पुरा गँगस्टरोका एरिया, स्कूल मे ही थी मेरे हाथो मे हतकडीयां, हम लेने आये हप्ता असे शब्द असलेले रॅप साँग तयार करुन या युवकांनी समाज माध्यमावर टाकले होते. पण रॅप साँगवरुन त्यांनी केलेली भाईगीरी त्यांना चांगलीच महागात पडली. पोलिसांनी थेट गुन्हा दाखल केला. या युवकांना माफी मागायला लावून त्यांचा व्हिडिओ पोलीसांनी व्हायरल केला.

आणखी वाचा - मावशी आणि भाचीचं अपहरण करुन तब्बल एक महिने सामूहिक बलात्कार, रुममध्ये पोहोचल्यानंतर पोलीसही हादरले

दरम्यान, काही दिवसांपूर्वी नांदेड (Nanded Crime) शहरातील भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पार्किंगवरुन दोन गटात वाद झाला. या भांडणात आरोपीने तरुणाचा तलवारीने मनगटापासून हात छाटला होता. त्यावेळी गुन्हेगारामध्ये वचक रहावी, यासाठी  तिन्ही आरोपिंची शहरातून धिंड काढल्यात आली होती. अशातच आता या केसमध्ये पोलिसांनी व्हिडिओ व्हायरल केला आहे.

Read More