Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

नायगावमध्ये गुप्तधनासाठी धक्कादायक प्रकार, महादेव मंदिरात पिंड सरकवून खोदकाम

गुप्तधनासाठी चक्क हेमाडपंथी मंदिरात खोदकाम, नागरिकांमध्ये संताप

नायगावमध्ये गुप्तधनासाठी धक्कादायक प्रकार,  महादेव मंदिरात पिंड सरकवून खोदकाम

सतिश मोहिते, झी मीडिया, नांदेड : नांदेडमध्ये एक धक्कादायक प्रकार उडकीस आला आहे. गुप्तधनाच्या लालसेपोटी चक्क महादेव मंदिरातील पिंड बाजूला काढून खोदकाम करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये समोर आला आहे. नायगाव तालुक्यातील कुष्णूर येथे औद्योगिक वसाहतीत पुरातन महादेव मंदिर आहे.

या महादेव मंदिराच्या परिसरात गुप्त धन असल्याची चर्चा होती. त्यातूनच काही अज्ञात चोरट्यानी महादेव मंदिरातील पिंड बाजूला सरकवून खोल खड्डा खोदला. पिंडीखाली जवळपास 10 फूट खोल खड्डा खोदण्यात आला. सकाळी ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.

पण पोलिसांना अद्याप चोरट्यांचा काही सुगावा लागला नाहीये. दरम्यान गुप्त धनासाठी चक्क महादेवाची पिंड सरकवून खोदकाम करण्यात आल्याने संताप व्यक्त करण्यात येतोय. 

Read More