Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

मराठवाड्यातून दुष्काळ हटवणार - नरेंद्र मोदी

 मराठवाड्यातून दुष्काळ हटवणार असल्याचा नारा मोदींनी दिला.

मराठवाड्यातून दुष्काळ हटवणार - नरेंद्र मोदी

बीड : काश्मीरमधून ३७० हटवलं तसा मराठवाड्यातून दुष्काळ हटवणार असल्याचा नारा दिला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. मोदी यांची पंकजा मुंडेंच्या परळीत सभा झाली. या सभेत त्यांनी  तसेच ३७० बाबत टीका करणाऱ्यांचा मोदींना चांगलाच समाचार घेतला. जनताच काँग्रेस राष्ट्रवादीला धडा शिकवणार असल्याची टीका त्यांनी केली. सभेपूर्वी मोदींनी वैजनाथाचं दर्शन घेत आरती आणि पूजा केली. यावेळी त्याच्यासोबत पंकजा मुंडेही उपस्थित होत्या. 

दरम्यान, राज्यातल्या प्रचाराचा शुभारंभ राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी दसऱ्याच्या मुहुर्तावर पंकजा मुंडेंच्या मतदारसंघातून केला. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंकजांच्या परळीत सभा झाली. त्यामुळे पंकजा मुंडेंना पक्षाच्या ओबीसी चेहरा म्हणून पुढे करण्यात येत आहे का, की त्यांच्यासमोर धनंजय मुंडेंनी कडवे आव्हान उभे केल्यामुळे पंकजांना मोदी-शाहांची गरज भासली आहे, असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.  

परळीनंतर नरेंद्र मोदींची आज साताऱ्यात सभा आहे. मोदींच्या स्वागतासाठी संपूर्ण सातारा सज्ज झालं असून छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भवानी तलवार, चांदीची मुद्रा, मराठीशाही पगडी आणि मेघडंबरी भेट दिले जाणार आहे. याबाबत खुद्द उदयनराजेंकडून माहिती देण्यात आली.

Read More