Nashik Crime: राज्यामध्ये भूमाफिया सर्वसामान्यांच्या जमिनी बळकवण्याचे प्रकार आता कॉमन झालेत. नाशिकमध्ये मात्र यापेक्षा धक्कादायक आणि वेगळी घटना घडलीय. नाशिक पोलीस आयुक्तालयाची जागाच थेट बळकावण्याचा प्रयत्न समोर आलाय. या प्रकरणी खुद्द नाशिक पोलिसांनी आता 22 बांधकाम व्यावसायिकांविरोधात गुन्हा दाखल केलाय.
नाशिकच्या शरणपूर गावठाण परिसरात जुनं पोलीस आयुक्त कार्यालय आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली ही जागा नाशिक डायोसेशन ट्रस्ट असोसिएशन म्हणेजच एनडीटीए च्या मालकीची आहे.. मात्र नाशिक डायोसेशन काऊंसिल म्हणजेच एनडीसी ही कंपनी स्थापन करून या जमिनीवर हक्क सांगण्यात आला.. आणि नामसार्धम्याच्या आधारे ही जमीन बिल्डरांना विकण्याचा प्रयत्न झाला. भूमी अभिलेख कार्यालयाच्या अहवालामुळे हा घोटाळा उघडकीला आलाय. या प्रकरणी एनडीसीच्या 15 जणांवर तर 22 बांधकांम व्यावसायिकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
बिल्डर्सकडून नाशिकमधील जुन्या पोलीस आयुक्तालयाची जमिन हडपण्याचा प्रयत्न झाला. बनावट दस्तऐवज बनवत जमिन बळकावण्याचा डाव होता. भूमी अभिलेख विभागाच्या अहवालानंतर हा डाव फसला. 300 कोटींची जमिन 1 कोटी 80 लाखांना लाटण्याचा कट होता. नाशिक डायोसेशन ट्रस्ट असोसिएशन म्हणजेच एनडीटीएच्या नावे जमिन मात्र नाशिक डायोसेशन काऊंसिल म्हणजेच एनडीसी कंपनी स्थापन करून जमिनीवर हक्क सांगण्यात आला. नाव साधर्म्याचा गैरफायदा घेत जमिन विक्रीचा प्रयत्न होता. या प्रकरणी नाशिक डायोसेशन काऊंसिल म्हणजेच एनडीसीच्या 15 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणात 22 बांधकाम व्यावसायिकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले.
नाव साधर्म्याचा फायदा घेत नाशिक डायोसेशन काऊंसिल म्हणजेच एनडीसीने हा व्यवहार केलाय. मात्र 1945 आणि 54 च्या खरेदी विक्री रेकॉर्डनुसार ही जागा केवळ एनडीटीए म्हणजेच नाशिक डायोसेशन ट्रस्ट असोसिएशनची असल्याचं समोर आलंय.
राज्यातील महसूल यंत्रणेचे कायदे इतके कमकुवत आहेत याचाच प्रत्यय नाशिकच्या या प्रकरणात आलाय. या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या 37 जणांवर कठोर कारवाईची मागणी आता जोर धरू लागलीय.