Nashik Crime News : लग्न म्हणजे आयुष्याची नवी सुरुवात मात्र, नाशिकमध्ये एका नववधूने लग्नाच्या पहिल्याच रात्री धक्कादायक कृत्य केले. या नवरीने सासरच्यांना जेवणात गुंगीचं औषध दिलं. सकाळी झोपेतून उठल्यावर सासरच्या मंडळींना मोठा धक्का बसला. नवरदेवाच्या पायाखालची जमीन सरकली. या नवरीने सगळ्यांचीत फसवणूक केली. नववधूवर सटाणा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
मुळची नांदेड येथील असलेल्या नववधूने लग्नानंतर अवघ्या काही तासांतच घरातील सोन्या चांदीचे दागिन्यावर डल्ला मारला. तीने आपल्या सासरच्या लोकांना जेवनातून गुंगीचे औषध टाकून सर्व दागिने घेऊन पसार झाल्याची घटना बागलाण तालुक्यातील लखमापुर येथे घडली आहे. या प्रकरणी सटाणा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लखमापुर येथील एका तरुणासाठी त्यांच्याच नातेवाईक कडून नांदेड येथील नवरीचे स्थळ सुचवले होते. सध्या नवरी मुलीचे स्थळ मिळणे अवघड झाल्याने मुला कडील मंडळींकडून नवरी मुलीच्या घरच्यांना दोन लाख रुपये देण्याचे ठरले. ठरल्या नुसार वधू कडील एक महिला व एक पुरुष नववधू लीना मांदळे हिला घेऊन लखमापुर येथे आले. या दोघांचा छोटेखानी लग्न पार पडला.
नववधूच्या परिवाराने रजिस्टर लग्न करायचे आहे म्हणून नव विवाहीत वधू वरांना आणि मुलाच्या घरच्या लोकांना नाशिक येथे बोलावले. ऐनवेळी पन्नास हजार रुपये जास्त मागीतले तरीही मुलाच्या घरच्यांनी ठरलेल्या पेक्षा जास्त पन्नास हजार रुपये रोख देऊन लग्न विधी पार पडला. पाचोरे परिवार लखमापुर येथे आला. नंतर वनवधू लिना ने रात्री सर्वांना आवडीचे जेवण बनवले. त्यात तिने विषारी गुंगीचे औषध टाकले. घरातील सर्वांनी जेवन करुन काही वेळातच गाढ झोप लागली. घरी नविनच शुभकार्ये झाल्यामुळे त्या तरुणाचा भाऊ आणि त्याची पत्नी घरी आलेले होते. घरातील सात सदस्य बाहेर गाढ झोपेत असल्याचे बघून मध्यरात्री च्या दरम्यान वनवधू ने घरातील दागदागिने व रोख रक्कम घेऊन पोबारा केला.
सकाळी उठल्यावर प्रत्येकाला चक्कर येत असल्याचे जाणवले. त्यामुळे सर्वांनी दवाखाना गाठला. तेथे गेल्यावर गुंगीचे औषध जेवनात खाल्ले गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. सर्वांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घरातील दागदागिने आणि रोख रक्कम घेऊन वनवधूने पोबारा केला असल्याचे लक्षात आले. याप्रकरणी सटाणा पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.