Nashik Crime News: देशभरात सध्या सोनम रघुवंशी प्रकरणाची चर्चा आहे. इंदूर येथील राजा आणि सोनम रघुवंशी मेघालयात हनिमूनला गेले असताना सोनमने प्रियकरासह राजा रघुवंशीची हत्या घडवून आणली. हे प्रकरण ताजे असतानाच नाशिकमध्येही असाच भयानर प्रकार उघडकीस आला आहे. पत्नीनेच पतीवर कुऱ्हाडीचे घाव घालत त्याचे तुकडे केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या घटनेने कुटुंबीयदेखील सून्न झाले आहेत.
नाशिकच्या सुरगाणा तालूक्यातील मालगोंदा येथील यशवंत मोहन ठाकरे याचा त्याच्याच पत्नीने कु-हाडीचा घाव घालत हत्या केल्याची घटना महिनाभरानंतर उघडीस आली आहे. दोन महिन्यापासून गुजरातमध्ये मजूरीसाठी गेलेला मुलगा परत न आल्याने यशवंतच्या आई-वडीलांनी सुनेकडे चोकशी केली. मात्र सूनसुध्दा गुजरातच्या बिलीमोरा येथे निघून गेली. घरच्यांनी मुलगा परत आला नाही याची चौकशी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याची काहीच खबरबात मिळाली नाही.
मुलाचा काहीच पत्ता लागत नाही हे पाहून आई-वडील हतबल झाले होते. अखेर यशवंत याच्या भावाची बायको त्याची पत्नी प्रभाला भेटायला आली असता तीच्या नजरेत काही संशयास्पद गोष्टी दिसून आल्या. दारात असलेल्या यशवंतची चप्पल प्रभा मांडीखाली लपवून बसली होती. त्यामुळं तिला संशय आला. तेव्हा तिने आपल्या नव-याच्या कानावर या गोष्टी घातल्या. त्यानंतर या घटनेला वाचा फुटली पोलिसांनी शोध घेतल्यानंतर घरातील शोषखड्यात त्याचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी गोणीमधील तुकडे केलेला मृतदेह ताब्यात घेतला असून या प्रकरणात सुरगाणा पोलिस अधिक तपास करीत आहे.
पोलिसांना यशवंतचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी तातडीने प्रभाला ताब्यात घेत चौकशी केली. कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची कबुली दिली आहे. तसंच, शरीराचे मान, हात पाय, धड कापून गोणीमध्ये भरून शोषखड्यात प्रेत टाकून पुरण्यात आले. वास येऊ नये म्हणून त्यावर औषधे टाकल्याचीही कबुली तिने दिली आहे. यशवंतच्या पाठीमागे मुलगा, आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे.