Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

थंडीचा द्राक्षबागांना फटका, तर गव्हाला फायदा

द्राक्षाला त्याचा फटका बसला असला तरी गहू पिकाला त्याचा फायदा होत आहे. वाढत्या थंडीमुळं गहू उत्पादक खुशीत आहेत.

थंडीचा द्राक्षबागांना फटका, तर गव्हाला फायदा

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : विक्रामी थंडीचा फटका नाशिक जिल्ह्यातील द्राक्षबागांना बसू लागली असून थंडीमुळं द्राक्षमण्यांचा रंग बदलला आहे. द्राक्षमणी लालसर झाले असून त्यामुळं द्राक्ष बागायतदारांचं कोट्यावधींचं नुकसान होण्याची शक्यता आहे. 

दोन दिवसांपासून  थंडीचा कडाका वाढला

गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे,  द्राक्षाला त्याचा फटका बसला असला तरी गहू पिकाला त्याचा फायदा होत आहे. वाढत्या थंडीमुळं गहू उत्पादक खुशीत आहेत. 

निफाडमध्ये  पारा ७.४ अंश सेल्सिअसवर

द्राक्ष पंढरी असलेल्या निफाडमध्ये  पारा ७.४ अंश सेल्सिअस पर्यंत घसरला आहे. निफाड परिसरातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रामध्ये  ७.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं आहे.  

पारा ७ ते ८ अंशाच्या आसपास

या हंगाममध्ये गेल्या आठ दहा दिवसापासून पारा ७ ते ८ अंशाच्या आसपास राहिलेला आहे. वातावरणात असलेल्या या थंडीचा गहू आणि हरभरा पिकाला  चांगला फायदा होणार आहे. 

गव्हाच्या उत्पादनात वाढ होणार

आणखी आठवडाभर हे तपमान असेच राहणार असल्यामुळं गव्हाच्या उत्पादनात वाढ होणार, असल्याचा कृषी तज्ञांनी अंदाज व्यक्त केला आहे. 

Read More