Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

महाराष्ट्रातील दोन बड्या पोलीस अधिकाऱ्यांवर बलात्काराचा आरोप! नाशिक हनी ट्रॅप प्रकरणात अत्यंत धक्कादायक ट्विस्ट

Nashik Honey Trap Case:  नाशिक हनी ट्रॅप प्रकरणात अत्यंत धक्कादायक ट्विस्ट आला आहे.  महाराष्ट्रातील दोन बड्या पोलीस अधिकाऱ्यांवर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. 

 महाराष्ट्रातील दोन बड्या पोलीस अधिकाऱ्यांवर बलात्काराचा आरोप! नाशिक हनी ट्रॅप प्रकरणात अत्यंत धक्कादायक ट्विस्ट

Maharashtra Honey Trap Case : शासकीय यंत्रणेतले अनेक उच्चाधिकारी हनीट्रॅपमध्ये अडकल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस नेते नाना पटोलेंनी विधानसभेत  केला होता.  या हनीट्रॅपच्या माध्यमातून सरकारची गोपनीय माहिती चोरली जातेय का याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. याच नाशिक हनी ट्रॅप प्रकरणात अत्यंत धक्कादायक ट्विस्ट आला आहे.  महाराष्ट्रातील दोन बड्या पोलीस अधिकाऱ्यांवर बलात्काराचा आरोप झाला आहे. 

नाशिक हनी ट्रॅप प्रकरणातील महिलेनं दोन पोलीस अधिकाऱ्यांवर बलात्काराचा आरोप केल्यानं खळबळ उडाली आहे. करूणा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन पीडितेची बाजू मांडली. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात हनी ट्रॅपचा मुद्दा चांगलाच तापला. पत्रकार परिषदेत करूणा मुंडे यांनी या महिलेची बाजू मांडली. आपल्यावर 2 पोलीस अधिकाऱ्यांनी बलात्कार केला. 

याबाबत तक्रार करायचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी आपल्यासह आपल्या मुलीवरही गुन्हा दाखल केल्याचा आरोप महिलेनं केला. त्या 2 पोलीस अधिका-यांनी मुंबईतील घाटकोपरमध्ये टू बीएचके फ्लॅट घेतलाय. त्याठिकाणी बांगलादेशी महिला आणतात आणि दारू पार्टी करून त्यांचा वापर करतात असा आरोपही पीडितेनं केला.  हनी ट्रॅपमध्ये अनेक अधिकारी आणि राजकीय नेते अडकले असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला होता. त्याला मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर दिले होते.. ना हनी ना ट्रॅप आहे असं उत्तर फडणवीसांनी दिलंय.. हनी ट्रॅपमध्ये कुणीह अडकलं नसल्याचं फडणवीस म्हणालेत... नाना पटोलेंनी टाकलेला बॉम्ब आमच्यापर्यंत पोहोचलंच नाही असा टोलाही फडणवीसांनी लगावलाय.

काय हे नेमकं हनी ट्रॅप प्रकरण?

हनीट्रॅप प्रकरण नाशिकपासून अकोल्यापर्यंत सरकारच्या वेगवेगळ्या विभागात सुरु असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. त्याला अधिकृत दुजोरा मात्र कोणीही देत नाही. नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली. विधानसभा अध्यक्षांनीही सरकारला नाना पटोलेंनी जो दावा केलाय त्या दाव्यातील तथ्य तपासण्याचे आदेश दिले.

 

Read More