Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

नाशिकमध्ये भाजपाचा राष्ट्रवादीला अघोषित पाठिंबा

 या निवडणुकीला शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राष्ट्रवादीकडून शिवाजी सहाणे तर अपक्ष म्हणून परवेज कोकणी आपले नशीब आजमावत आहे.

नाशिकमध्ये भाजपाचा राष्ट्रवादीला अघोषित पाठिंबा

 नाशिक : नाशिकमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होतेय.  या निवडणुकीला शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राष्ट्रवादीकडून शिवाजी सहाणे तर अपक्ष म्हणून परवेज कोकणी आपले नशीब आजमावत आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत  नाशिकमध्ये एकूण 644 मतदार मतदान करणार आहे. तालुक्यातील तहसील कार्यालयांत आणि नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयतील मतदान कक्षात मतदान केले जाणार आहे. या मतदानासाठी प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे.  दरम्यान नाशिक निवडणूकीत भाजपने  राष्ट्रवादीला पाठिंबा द्यायचा अघोषित निर्णय घेतलाय.

Read More