Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

बाळाला स्तनपान करणाऱ्या सैनिकपत्नीला पाहून नियत फिरली, नराधमाने चाकूचा धाक दाखवला अन् मग...

Nashik Crime News: घरात घुसत बाळाला मारण्याची धमकी देत सैनिकपत्नीचा विनयभंग करणाऱ्या संशयिताला अटक करण्यात आली आहे.   

  बाळाला स्तनपान करणाऱ्या सैनिकपत्नीला पाहून नियत फिरली, नराधमाने चाकूचा धाक दाखवला अन् मग...

Nashik Crime News: नाशिकच्या देवळाली कॅम्पमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर पहारा ठेवणाऱ्या सैनिकाच्या घरी मात्र त्याचे कुटुंबच सुरक्षित नसल्याची घटना समोर आली आहे. स्तनपान करणाऱ्या मातेला बघून घरात शिरलेल्या संशयित चोराची नियत फिरली अन् चाकूचा धाक दाखवत त्याने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

चोराने बाळाला ठार मारण्याची धमकी देत त्याने सैनिकपत्नी असलेल्या या महिलेचे 4 लाख रुपयांचे दागिने लुटले. तसंच तिला अंगावरील कपडे काढण्यास सांगत मोबाइलमध्ये तिचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत पलायन केले. याबाबत महिने तक्रार दिल्यानंतर या संशयितला पोलिसांनी अटक केली आहे. 

पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी संशयिताला जेरबंद केले आहे. या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेत गुन्हे शाखेच्या दोन्ही युनिटला संशयिताचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. पथकाने संशयिताला राका कॉलनी येथे अटक केली असून सुशील अनुराग ठाकूर असे त्याचे नाव आहे. पीडित महिलेचा पती लष्करात असून सीमेवर देशरक्षणार्थ तैनात आहे. घरी लहान बाळासह सैनिकपत्नी एकटी असतांना दुपारी संशयिताने कॅन्टोन्मेंटचा कर्मचारी असल्याचे सांगून पाण्याचे प्रेशर चेक करायचे आहे असे सांगत घरात प्रवेश केला. 

संशयित बाथरूममध्ये गेला. तेव्हा महिला बाळाला दूध पाजत असल्याचे संशयिताने पाहिले आणि त्याची नियत फिरली. चाकूचा धाक दाखवत महिलेला अंगातील टि शर्ट वरती आणि पॅन्ट खाली करण्यास सांगितले. महिलेने नकार दिला असता संशयिताने बाळाला मारुन टाकण्याची धमकी दिली. तेव्हा त्या मातेने या विकृताचे म्हणने ऐकत कपडे काढले. एवढ्यावरच न थांबता फोटो, व्हिडिओ काढत व्हायरल करण्याची धमकी देत घरातील सोन्याचे दागिने, रक्कम मागून लुटून नेली. 

राका कॉलनी येथे असल्याची माहिती मिळाली सापळा रचून संशयिताला अटक केली. या संशयित आपण तब्बल एक लाख 38 हजार रुपयाचा मुद्देमालदेखील जप्त करण्यात आला आहे. 

Read More